करंजे महावितरण कार्यालयाला गांधीगिरीने ठोकले टाळे

शाहुपूरी गंगासागर कॉलनी आझादनगर येथील नागरिकांनी गांधीगिरी करून महावितरणच्या करंजे येथील कार्यालयास टाळे ठोकले. शाहुपूरी , आझादनगर येथे गेल्या अनेक दिवसांपासून कमी दाबाने वीज पुरवठा होत असल्याची तक्रार वारंवार करून देखील कोणत्याही प्रकारची कार्यवाही होत नसल्याने नाईलाजास्तव टाळे ठोकावे लागले असल्याची माहिती ग्रामपंचायत सदस्य व शाहुपूरी विकास आघाडीचे नवनाथ जाधव यांनी दै. प्रभातशी बोलताना दिली.

यावेळी ते म्हणाले, शाहूपुरी परिसरातील गंगासागर कॉलनी व आझादनगर विभागात गेली अनेक वर्षे नागरिकांना अत्यंत कमी दाबाने वीजपुरवठा होत आहे. याचा परिणाम या भागातील बोअरवेल, टिव्ही , वॉशिंग मशीन, मिक्‍सर तसेच घरातील नेहमीच्या लाईटव्यवस्थेवर परिणाम होऊन नागरिकांसह , विद्यार्थ्यांच्या अभ्यासावर परिणाम होत होता. कमी दाबाच्या वीजेमुळे दैनंदिन आवश्‍यक असणारी सर्व कामे करणे अवघड झाले आहे.

-Ads-

महिला वर्गाला ही अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे. प्राधिकरणाची पाणी वितरणाच्या एका बाजूला अडचण व दुसऱ्या बाजूला महावितरणाने खोळंबा केल्याने आझादनगर गंगासागर कॉलनी मधील रहिवासीयांची अवस्था बिकट झाली आहे. सहाय्यक अभियंता शितल डोळे यांच्या समक्ष फोन कोणी उचलत नाही याची पाहणी केली असता तो फोन खात्यातील कर्मचारी वर्गाने बंद करून ठेवला असल्याचे त्यांनी मान्य केले. त्यामूळे संतप्त झालेल्या जमावाने जनतेच्या भावनांशी खेळण्याचा प्रयत्न करणा-या अधिका-यांच्या कार्यालयालाच टाळे ठोकले.

यावेळी नवनाथ जाधव, संभाजी इंदलकर व आझाद नगर गंगासागर कॉलनीतील महिला व नागरिक मोठया संख्येने उपस्थित होते. सर्वांनीच लेखी आश्वासन व प्रत्यक्ष कार्यवाहीची सुरुवात करण्याचा आग्रह धरला.यामुळे हा प्रश्न तसेच भविष्यातील सर्व तक्रारींची योग्य ती दखल हे कार्यालय घेईल असे सांगितले.या आश्वासनाची पुर्तता न झाल्यास भविष्यात नागरिकांच्याकडून जो आंदोलनाचा पवित्रा घेतला जाईल तो अत्यंत आक्रमक असेल व त्यानंतर उद्‌भवणा-या सर्व परिणामांची जबाबदारी संबंधित शासन विभाग, अधिकारी व कर्मचाऱ्यांची असेल असा इशाराही उपस्थितांनी यावेळी दिला.

दोन दिवसापूर्वी झालेल्या पावसामुळे बऱ्याच ठिकाणची झाडे पडली . यामुळे ट्रान्सफॉरर्मर मध्ये बिघाड झाल्या कारणाने कमी दाबाने वीज वितरण होत होते. कार्याल्यामध्ये अपूरे कर्मचारी यामूळे वेळ प्रसंगी फोन रिसीव्ह होत नाही. कर्मचारी एखादेवेळी बाहेर कामा निमित्त गेल्यानंतर गैरसोय झाली असेल. शाहुपूरी करीता थ्री फेजचा प्रस्ताव तयार केला आहे. तो लवकरच मंजुर झाल्यानंतर अशा समस्या उद्‌भवणार नाहीत. सध्या बिघाड झाला आहे तो लवकरात लवकर दुरूस्त करून नागरिकांची होणारी गैरसोय टाळण्याचा प्रामाणिक प्रयत्न करू.
– सहाय्यक अभियंत्ता शितल डोळे महावितरण कार्यालय करंजे शाखा सातारा 

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)