करंजेपुल उपसरपंचपदी सारिका गायकवाड

सोमेश्वरनगर- करंजेपुल (ता. बारामती) येथील ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी सारिका नानासो गायकवाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली. सरपंच वैभव गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली शुक्रवार (दि.29) झालेल्या बैठकीत ही निवड करण्यात आली. या पूर्वीच्या उपसरपंच सुनीता गणेश गायकवाड यांनी राजीनामा दिल्याने रिक्त झालेल्या जागेवर व एकमेव अर्ज सारिका गायकवाड यांचा आल्यामुळे ही निवड सर्वानुमते करण्यात आली, ग्रामस्थांच्या वतीने गायकवाड यांचा सत्कार करण्यात आला. यावेळी ग्रापंचायत सर्व सदस्य, कर्मचारी, मान्यवर व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)