करंजेच्या तंटामुक्‍ती अध्यक्षपदी विकास भंडलकर

करंजे- करंजेच्या (ता. बारामती) तंटामुक्‍ती समिती अध्यक्षपदाच्या निवडणुकीत विकास भंडलकर हे 59 मतांनी विजयी झाल्याचे सरपंच जया गायकवाड यांनी दिली. करंजे ग्रामपंचायतीची मंगळवारी (दि. 22) सरपंच जया गायकवाड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामसभा पार पडली. यात विविध विषयांवर चर्चा झाली. तर तंटामुक्‍ती समितीचे अध्यक्ष संताजी गायकवाड यांनी पदाचा राजीनामा दिल्याने रिक्‍त झालेल्या पदावर निवडणूक घेण्याचे ठरले. त्यावेळी विकास भंडलकर, प्रताप गायकवाड, मुरलीधर गायकवाड या तिघांनी उमेदवारी अर्ज भरले. तर 277 मतदारांनी मतदानासाठी नोंदणी केल्यानंतर निवडणूक पार पडली. यात विकास भंडलकर यांना 168, प्रताप गायकवाड यांना 100, तर मुरलीधर गायकवाड यांना 9 मते पडल्याने विकास भंडलकर यांना 59 मतांनी विजयी झाल्याचे सरपंच जया गायकवाड, बारामती पंचायत समितीचे विस्तारधिकारी दत्तात्रय खंडागळे यांनी घोषित केले. यावेळी उपसरपंच कालिदास सावंत, ग्रामपंचायत सर्व सदस्य, ग्रामस्थ, कर्मचारी उपस्थित होते. विषयवाचन ग्रामसेवक संजय भोसले यांनी केले. निवडीनंतर भंडलकर म्हणाले की, गावातील छोटे- मोठे वादविवाद गावातच मिटवण्यावर भर देणार आहे. तसेच सामाजिक बांधिलकी जपण्यासाठी नेहमी प्रयत्नशील राहील असे त्यांनी नमूद केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)