करंजीत चोरट्यांनी घातला धुमाकूळ

आठ दिवसात तपास न लावल्यास “रास्ता-रोको’
पाथर्डी – तालुक्‍यातील करंजी गावात व परिसरात मंगळवारी मध्यरात्री चोरट्यांनी चांगलाच धुमाकुळ घातला. 8 घराचे दरवाज्याच्या कड्या तोडून सोने,मोबाईल व किंमती वस्तू असा लाखो रुपयांचा ऐवज लांबविला. आठ दिवसात पोलिसांनी तपास लावला नाही तर “रास्ता-रोको’ आंदोलन करण्याचा इशारा संतप्त ग्रामस्थांनी दिला.
मध्यरात्री 1 ते 3 वाजण्याच्या दरम्यान चोरट्यांनी करंजी गावाला लक्ष करित गावातील राजेंद्र दिलीप अकोलकर, जाकीर मणियार, योहान गणपत क्षेत्रे, लिलाबाई क्षेत्रे, म्हातारदेव अकोलकर, गोपीनाथ रामनाथ अकोलकर, भाऊसाहेब क्षेत्रे, संजय मुखेकर यांच्या घराच्या दरवाज्याच्या कड्या तोडून घरातील सामानाची उचका-पाचक घरातील सोन्याचे दागिने, मोबाईल, गळ्यातील मंगळसुत्र, कानातील दागिने आदि लाखो रुपयांचा किंमती ऐवज चोरट्यांनी चोरून नेला.
नगर- पाथर्डी महामार्गावरील करंजी हे गाव मोठ्या बाजारपेठेचे गाव म्हणून ओळखले जाते. येथुन 10 किलोमिटर अंतरावर मराठवाड्याची हद्द सुरु होते. येथे असलेल्या दुरक्षेत्र कायमस्वरूपी पोलिसांची नेमणुक करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांनी अनेक वेळा करूनही याकडे पोलीस खाते जाणून-बुजून दुर्लक्ष करित आहे. गेल्या सहा महिन्यात येथील हॉटेल फोडण्याच्या सत्रानंतर या चोऱ्यांचे लोण गावभर पसरले असल्यामुळे ग्रामस्थांमध्ये भितीचे वातावरण पसरले आहे.
गावात रात्री झालेल्या चोऱ्यांचा तपास पोलीस खात्याने येत्या आठ दिवसात न लावल्यास तसेच येथील दुरक्षेत्रावर कायमस्वरूपी पोलिसांची नेमणुक न केल्यास ग्रामस्थ आंदोलन करतील,असा इशारा नवनिवार्चित सरपंच बाळासाहेब अकोलकर, माजी सभापती ऍड. मिर्झा मणियार, राजेंद्र क्षेत्रे, सुभाष अकोलकर, श्रीकांत अकोलकर, संतोष अकोलकर, शिवाजी भाकरे, बबनराव अकोलकर, रावसाहेब क्षिरसागर, संपत क्षेत्रे, गोपीनाथ अकोलकरसह अनेक ग्रामस्थांनी दिला आहे.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)