करंजीच्या हॉटेल समाधानवर पोलिसांचा छापा

पाथर्डी – तालुक्‍यातील करंजी येथील “हॉटेल समाधान’वर अवैधपणे विदेशी दारूची विक्री करणाऱ्या हॉटेल मालक व कामगारावर पाथर्डी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पो. कॉ. अरुण शेकडे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक राजेंद्र रामदास अकोलकर व सचिन ओंमकार पांडे यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत पोलिसांकडून समजलेली माहिती अशी की,करंजी येथील हॉटेल समाधानवर अवैधपणे देशी-विदेशी दारूची विक्री होत असल्याची माहिती पोलीस निरीक्षक राजेंद्र चव्हाण यांना मिळाली होती. या माहितीच्या आधारे बिट अंमलदार तसेच पो.कॉ.निलेश म्हस्के, भगवान सानप, पो.कॉ.फळके यासह इतर पोलिसांना संबंधित ठिकाणी छापा टाकण्याचे आदेश निरीक्षक चव्हाण यांनी दिले.

संबंधित करंजी येथील हॉटेल समाधानवर छापा टाकला असता हॉटेलच्या काउंटरजवळील एका पत्र्याच्या पेटीत अवैधरित्या विदेशी दारू आढळून आली. यावेळी हॉटेल मालक राजेंद्र अकोलकर हा पळून गेला. तर हॉटेलवरील कामगार सचिन पांडे याला पोलिसांनी ताब्यात घेऊन पाथर्डी पोलीस ठाण्यात आणले. या छाप्यात एकूण 3500 रुपयांची विदेशी दारू जप्त करण्यात आली आहे. पो. कॉ. अरुण शेकडे यांच्या फिर्यादीवरून हॉटेल मालक राजेंद्र अकोलकर व सचिन पांडे (रा.दोघेही-करंजी) यांच्या विरोधात पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)