कमी पाणी वापरासाठी मल्चिंग पेपरचा वापर

बेल्हे- जुन्नर तालुक्‍याच्या पूर्व भागात शेतकरी वर्ग पाण्याचा शेतीसाठी योग्य वापर, कमी पाणी कसे लागेल, यासाठी आपल्या शेतात मल्चिंग पेपर वाचत ठिबक सिंचन या आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करताना दिसुन येत आहे.
जुन्नर तालुक्‍याच्या पुर्व भागातील राजुरी, वडगाव आनंद, आळे, आळेफाटा, बेल्हे, रानमळा, खामुंडी, गायमुखवाडी, गुंजाळवाडी, लवणवाडी, बोरी बुद्रूक साळवाडी, जाधववाडी, वडगाव कांदळी, भोरवाडी या गावांतील अनेक शेतकरी प्रगतशील शेतकरी आहे. सध्या दिवसेंदिवस पावसाचे प्रमाण कमी होत आहे. भविष्यकाळात पाण्याचे प्रमाण अतीशय कमी होणार आहे. यावर उपाय म्हणून या भागातील शेतकऱ्यांनी कमी पाण्यामध्ये चांगले पिक कसे घेता येईल, यासाठी प्रयत्न करू लागला आहे. शेतकऱ्यांनी मिरची, टोमॅटो, वांगी अशा पिकांसाठी मल्चिंग पेपरचा वापर केलेला दिसून येत आहे.
या मल्चिंग पेपरचा शेतात वापर केल्याने पिकाला जेवढे लागते तेवढेच पाणी मिळत असल्याने पाण्याची ही बचत होऊन पिकाला योग्य प्रमाणात पाणी मिळाल्याने पिक ही चांगल्या प्रमाणात आलेले दिसत आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)