कमी दाबाने पाणी पुरवठा ; नागरिकांना मनस्ताप

प्रशासनाचे दुर्लक्ष : मारुती भापकर यांचा आरोप

पिंपरी – पिंपरी-चिंचवड महापालिका पाणी पुरवठा विभागाच्या गलथान कारभारामुळे मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, चिंचवड स्टेशन, महात्मा फुलेनगर आदी परिसरात कमी दाबाने पाणी पुरवठा होत आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे महिलांना नाहक मनस्ताप सहन करावा लागतो, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते मारुती भापकर यांनी केला आहे.

याबाबत महापालिका आयुक्‍त श्रावण हर्डीकर यांना निवेदन देण्यात आले आहे. त्यामध्ये म्हटले आहे की, पिंपरी-चिंचवड महापालिका शहराला पवना धरणातून पाणीपुरवठा केला जातो. महापालिका प्रतिदिन 490 ते 495 दशलक्ष लीटर पाणीपुरवठा शहराला करु शकते. सध्यस्थितीला सुमारे 32 टक्‍के पाणीसाठा धरणामध्ये शिल्लक आहे. पाठबंधारे विभागाच्या सूत्रांनुसार, सुमारे 15 जुलैपर्यंत या पाणीसाठ्यात शहराला सुरळीत पाणीपुरवठा होवू शकतो. मात्र, तरीही शहरातील मोहननगर, काळभोरनगर, रामनगर, चिंचवड स्टेशन आणि महात्मा फुलेनगर आदी भागांत राजकीय हेतूने कमी दाबाने पाणीपुरवठा केला जातो.

टॅंकरमाफीयांच्या भल्यासाठी महापालिकेतील अधिकारी काही परिसरात कमी दाबाने आणि अपुरा पाणीपुरवठा करीत आहेत. कृत्रिम पाणीटंचाई निर्माण करुन नागरिकांना वेठीस धरले जात आहे. त्यामुळे महिलांना मनस्ताप झाला असून, यावर प्रशासनाने त्वरित कार्यवाही न केल्यास नागरिकांना सोबत घेवून महापालिकेवर तीव्र आंदोलन करणार आहे.
– मारुती भापकर, सामाजिक कार्यकर्ता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)