कमी-जास्त झाल्यास पोलीसच जबाबदार – भोरडे

तळेगाव ढमढेरे – चासकमान विभाग आणि पाटबंधारे विभागाच्या जमिनीवर काही कंपन्यांनी बेकायदेशीर अतिक्रमण केलेबाबत आवाज उठवल्यानंतर संबंधित आठ कंपन्यांवर शिक्रापूर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले होते. यामुळे अप्रत्यक्ष हितसंबंध दुखावले गेल्याने ग्राहक पंचायतीचे अशोक भोरडे यांनी पोलीस संरक्षणाची मागणी केली आहे. मात्र अद्याप ते न मिळाल्याने पुढील काळात काही बरे वाईट झाल्यास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे भोरडे यांनी सांगितले आहे.

भोरडे यांनी सहा दिवस उपोषण केल्यानंतर पाटबंधारे विभागाने लेखी पत्राद्वारे उपोषण सोडण्याची विनंती केली त्यावेळी कंपन्यांनी अतिक्रमण केलेल्या जागेची तातडीने मोजणी केल्यानंतर पंधरा दिवसांत कारवाई होईल. अतिक्रमण काढल्यानंतर वितरिकेतून शेतकऱ्यांसाठी शेतात पाणी जाण्यासाठी आवश्‍यक कामे एक महिन्यात पूर्ण करण्यात येतील, असे पत्राद्वारे सांगितले. त्यामुळे उपोषणाला तात्पुरती स्थगिती दिली आहे. दिलेल्या मागण्या पूर्ण केल्या नाही तर ठराविक कालावधीनंतर पुन्हा उपोषण करण्यात येणार आहे. शिरूर तहसील कार्यालयातील महसूल कामकाजाबाबत एकूण 14 मुद्दे उपस्थित केले होते त्यावर कारवाई होण्यास टाळाटाळ होत होती. महसूल सचिवांशी केलेल्या पत्रव्यवहार आणि उपोषणाचा दिलेला इशारा याची दखल घेऊन काही वाळू माफियांवर कारवाई करण्यात आली होती. भोरडे यांच्या तक्रार अर्जावर चौकशी करणे कामी शासनाच्या अप्पर जिल्हाधिकारी पुणे यांची नियुक्ती करण्यात आली. चौकशीदरम्यान अहवाल प्राप्त होताच पुढील कारवाई करण्यात येईल. गौणखनिज अधिकारी यांचे पथकामार्फत ईटीएस मशीनच्या साह्याने मोजणी सुरू करण्यात आली आहे. मोजणी झाल्यानंतर संबंधित दोषींवर फौजदारी गुन्हे व दंडात्मक कारवाई करण्यात येईल, अशा स्वरूपाचे पत्र शासनाच्या वतीने दिल्यानंतर उपोषण मागे घेण्यात आले.

झालेल्या या कारवाईमुळे अप्रत्यक्ष अनेकांचे हितसंबंध दुखावले गेले आहेत. तसेच वाळू माफियांवर झालेल्या कारवाईमुळे अशोक भोरडे यांच्यावर जीव घेण्याचा हल्ला किंवा घातपात होऊ शकतो, याबाबत पत्रव्यवहार केला होता. तरीही आजतागायत कोणत्याही स्वरूपाचे पोलीस संरक्षण दिले नाही. पुढील काळात होणाऱ्या घातपातास सर्वस्वी पोलीस प्रशासन जबाबदार राहील असे भोरडे यांनी सांगितले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)