कमी किमतीच्या मोबाइलला मागणी 

नवी दिल्ली: भारतात कमी दराच्या स्माटॅफोनसाठी मोठी बाजारपेठ आहे असे मोबीस्टार इंडिया आणि ग्लोबलचे सहसंस्थापक आणि मुख्य कार्यकारी अधिकारी कार्ल एनगो यांनी सांगितले. ते म्हणाले की कंपनीने सादर केलेल्या नव्या मालिकेत सी1 लाईट, सी1, सी2, ई1 सेल्फी आणि एक्‍स1 ड्युएल अशा पाच स्मार्टफोन्सचा समावेश आहे. सेल्फीकेंद्रित स्मार्टफोनच्या आमच्या नवीन रेंजसह वर्षाच्या अखेरीपर्यंत परवडणाऱ्या वाजवी किमतीतील आघाडीच्या 5 स्मार्टफोन्स ब्रॅंड्‌समध्ये स्थान मिळवण्याचे एक भाग बनण्याचे आमचे उद्दिष्ट आहे.

महाराष्ट्रातील आपल्या कामकाजाला भक्‍कम पाठबळ देण्यासाठी मोबीस्टार महाराष्ट्रातील 52 वितरक आणि 4000 रिटेलरसोबत भागीदारी करणार आहे. कंपनी महाराष्ट्रात 325 कर्मचाऱ्यांची भरती करणार असून 106 सेवा केंद्रे स्थापन करणार आहे. पश्‍चिम भारतात स्मार्टफोनचा वापर मोठ्या प्रमाणावर आहे. हे प्रमाण साधारण 28 टक्के इतके असल्यामुळे ही बाजारपेठ मोबीस्टार साठी इतकी महत्त्वाची आहे. ग्राहकांना पाच हजारांपासून अकरा हजार रुपयांपर्यंत वेगवेगळ्या किमतीत हे स्मार्टफोन उपलब्ध आहेत.


-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)