कमिन्सला एकदिवसीय मालिकेत विश्रांती

एकदिवसीय मालिकेत ऑस्ट्रेलियाच्या संघात मोठे बदल

मेलबर्न: नवीन वर्षातील क्रिकेटचे व्यस्त वेळापत्रक पाहता गोलंदाजांच्या कामाचा ताण कमी व्हावा म्हणून ऑस्ट्रेलिया भारताविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेतील पहिल्या तीन सामन्यात मिचेल स्टार्क, पॅट कमिन्स आणि जोश हेजलवूड यांना विश्रांती देणार आहे. मेलबर्न कसोटीमध्ये पेट कमिन्सने फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्ही विभागात ऑस्ट्रेलियासाठी सर्वात चांगली कामगिरी केली होती. 2019 मध्ये होणाऱ्या एकदिवसीय विश्वचषकासाठी खेळाडू तंदुरुस्त आणि ताजेतवाने राहावे हा यामागचा हेतू असल्याचे ऑस्ट्रेलियाचे प्रशिक्षक जस्टीन लॅंगरयांनी सांगितले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

लॅंगर पुढे म्हणाले, भारताविरुद्ध होणाऱ्या एकदिवसीय सामन्यासाठी संघाची निवड करणे आमच्यासाठी खूप आवाहनात्मक होते. आम्ही पहिल्या तीन एकदिवसीय सामन्यासाठी प्रमुख तीन गोलंदाजांना विश्राती देत आहोत जेणेकरून ते शेवटच्या दोन सामन्यासाठी पूर्ण विश्रांतीसह उतरतील. मला मान्य आहे की, कमिन्स मागील काही महिन्यांपासून खूप चांगला खेळ करत आहे. त्याला संघात न ठेवल्याने सर्व प्रश्न विचारतील. परंतु, पुढील विश्वचषक आणि ऍशेस मालिकेचे वेळापत्रक पाहता खेळाडू तंदुरुस्त राहावेत म्हणून हा निर्णय घेत आहोत. असेही ते पुढे म्हणाले.

भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेत कमिन्स हा ऑस्ट्रेलियाचा सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला आहे. त्याने 14 बळी घेतले असून 20. 7 ची सरासरी राखली आहे. दुखापतग्रस्त असल्याने कमिन्स इंग्लड आणि पाकिस्तान विरुद्धच्या मालिकांना मुकला होता. त्याने यंदाच्या आयपीएलमध्ये न खेळण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत लॅंगर म्हणाले, प्रत्येक खेळाडू वर्षांमध्ये स्वतःसाठी काही ध्येय ठेवत असतो. त्यामध्ये काही त्याला आयपीएल सारखी मोठी स्पर्धा खेळायचे असती तर कधी आरामाला महत्व द्यायचे असते. त्यामुळे व्यवस्थापन आणि खेळाडू यांनी समप्रमाणात प्रयत्न करून काही निर्णय घ्यावे लागतात, असेही ते पुढे म्हणाले.

रोहित शर्मा सिडनी कसोटीला मुकणार

भारताचा अघाडीचा खेळाडू रोहित शर्माला कन्यारत्न प्राप्त झाल्याने त्याने ऑस्ट्रेलिया दौर्यातील शेवटच्या कसोटीतून नाव माघारी घेतले असुन तो कौटुंबीक करणांसाठी मायदेशी जाण्याची परवानगी मागितली होती. भारतीय संघव्यवस्थापनाने त्याला परवानगी दिल्याने तो मायदेशी परतला आहे. परंतु, 8 जानेवारी पासुन सुरु होत असलेल्या एकदिवसीय मालिकेत तो परतणार आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)