कमाल तापमानात पुन्हा वाढ

पुणे – राज्यात कमाल तापमानात पुन्हा वाढ झाली असून प्रत्येक ठिकाणचे तापमान सरासरीच्या दोन ते तीन अंशाने वाढले आहे. पुण्यातही बुधवारी कमाल तापमान 34.8 अंश सेल्सिअस नोंदविले गेले ते सरासरीपेक्षा तीन अंशाने जास्त आहे. राज्यात सर्वत्र हवामान कोरडे असल्यामुळे तापमानात वाढ झाली आहे. ही परिस्थिती आणखी आठवडाभर राहणार आहे.

नैर्ऋत्य मान्सून हा देशाबाहेर गेल्यामुळे हवामान कोरडे झाले आहे. या हवामानामुळे राज्यातील तापमानात वाढ होत आहे. राज्यात ऑक्‍टोबरमध्ये साधारण कमाल तापमान 33 अंश सेल्सिअसच्या आसपास असते. यंदा मात्र प्रत्येक ठिकाणी वाढ झालेली दिसत आहे. बुधवारी राज्यात सर्वाधिक कमाल तापमान हे सांताक्रुझ येथे 37.6 अंश सेल्सिअस होते. याशिवाय अकोला, सोलापूर, औरंगाबादमध्ये 35 अंशाच्या पुढे गेले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

पुण्यात ऑक्‍टोबर महिन्यात 31 अंश सेल्सिअसपर्यंत तापमान असते; पण बुधवारी 34.8 नोंदविले गेले. हे सरासरीपेक्षा जास्त आहे. हवामान खात्याने दिलेल्या अंदाजानुसार आगामी काळातही पुणे शहरातील तापमान हे तीन ते चार अंश सेल्सिअसने अधिक राहणार आहे. त्याचबरोबर किमान तापमानात सुद्धा घट झाली आहे. शहरातील किमान तापमान 16 अंश सेल्सिअस होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)