कमाल खानवर पत्नीचा सक्‍त पहारा 

स्वयंघोषित चित्रपट समिक्षक कमाल रशिद खान उर्फ केआरकेने “मीटू’ अभियानाच्या भीतीने आपल्या सर्व महिला कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकले आहे. तसे करण्याचा आदेश आपल्याला पत्नीकडून मिळाल्याचेही त्याने एका ट्विटमध्ये म्हटले आहे. “मी तर बायकोचा गुलाम आहे. तिच्या आदेशाचे पालन मला करावेच लागते. म्हणूनच मी मुंबई आणि दुबईतील माझ्या ऑफिसमधील सर्व कर्मचारी महिलांना कामावरून काढून टाकले आहे.’ असे त्याने म्हटले आहे.

एवढेच नव्हे तर बायकोच्या आदेशानुसार आता कोणत्याही सिनेमाच्या पार्टीतही आपण जाणार नाही आणि कोणत्याही मुलीबरोबर बोलणारही नसल्याचेही त्याने म्हटले आहे. कमाल खानच्या पत्नीचे नाव आयेशा आहे. या दाम्पत्याला दोन मुलेही आहेत. कमाल खानने सुरुवातीच्या काळात ऍक्‍टिंग करण्याचा प्रयत्न केला. मात्र आता तो गारमेंट बिनझनेस आणि एक एन्टरटेनमेंट वेबसाईट चालवतो आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

अनेक सेलिब्रिटीजबाबत वादग्रस्त वक्‍तव्यामुळे तो चर्चेत आला होता. “मी टू’ अभियान जोरात सुरू असल्याने त्याच्या पत्नीला आणखीन वाद नको असावेत. म्हणूनच तिने त्याच्यावर कडक पहारा बसवला आहे. या सगळ्यामागे खरे कारण काय आहे, हे मात्र समजलेले नाही.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)