कमानींची अनामत रक्कम माफ करण्याचा प्रस्ताव मागे

प्रभात वृत्तसेवा
पुणे, दि. 29 – सार्वजनिक गणेशोत्सवाच्या शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्षानिमित्त शहरातील गणेश मंडळांना कमानीसाठी अनामत रक्कम आणि परवाना शुल्क यंदा माफ करण्यात यावे, अशी मागणी
करणारा स्थायी समितीपुढी प्रस्ताव मंगळवारी शिवसेना सदस्यांनी मागे घेतला.
गणेशोत्सवाचे हे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष आहे. पुण्यासह देशभरात सार्वजनिक गणेशोत्सव मोठ्या धुमधडाक्‍यात साजरा केला जात आहे. यानिमित्त पालिकेतर्फे वैविध्यपूर्ण उपक्रमांचे आयोजन
करण्यात आले आहे. शहरातील अनेक गणेश मंडळे गणेशोत्सवात रस्त्यावरच कमानी लावतात. यासाठी महापालिकेच्या आकाशचिन्ह आणि परवाना विभागातर्फे अनामत रक्कम आणि परवाना शुल्क आकारण्यात येते. मात्र, यंदा सार्वजनिक गणेशोत्सवाचे शतकोत्तर रौप्यमहोत्सवी वर्ष असल्याने यावर्षी ही अनामत रक्कम आणि परवाना शुल्क माफ करावे, अशा मागणीचा प्रस्ताव शिवसेनेचे गटनेते संजय भोसले, विशाल धनवडे आणि प्रमोद भानगिरे यांनी स्थायी समितीपुढे ठेवला होता. मात्र हे शक्‍य नसल्याचे प्रशासनातर्फे सांगण्यात आले. तसेच सुरक्षेच्या कारणास्तव हे करणे शक्‍य नसल्याचे प्रशासनाचे म्हणणे आहे. त्यामुळे सेना सदस्यांनी हा प्रस्ताव मागे घेतला.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)