‘कमांड अॅन्ड कंट्रोल’ सेंटरचे काम पूर्ण

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून उभारणी : मुख्यमंत्र्यांच्या हस्ते होणार उद्‌घाटन

पुणे – स्मार्ट सिटी मिशन अंतर्गत अनेक प्रकल्पांच्या अंमलबजावणीत अत्यानुधिक तंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या “इंटिग्रेटेड कमांड अॅन्ड कंट्रोल’ सेंटरला महापौर मुक्ता शैलेश टिळक यांच्यासह पालिकेचे प्रमुख पदाधिकारी व अधिकाऱ्यांनी भेट देऊन पाहणी केली.

या सेंटरचे उद्‌घाटन या महिन्याच्या अखेरीस मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार असून त्याचे नियोजन करण्यात येत आहे. सभागृह नेते श्रीनाथ भिमाले, स्थायी समितीचे अध्यक्ष योगेश मुळीक, वाहतूक पोलीस उपायुक्त तेजस्वी सातपुते, पुणे स्मार्ट सिटीचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य ज्ञान अधिकारी मनोजित बोस, तसेच पुणे महापालिकेचे आपत्ती व्यवस्थापन, माहिती तंत्रज्ञान अशा विविध विभागांचे अधिकारी यावेळी उपस्थित होते.

पुणे स्मार्ट सिटीच्या माध्यमातून मागील वर्षी बसविलेल्या 199 वाय-फाय हॉटस्पॉट्‌समध्ये आणखी 100ची भर टाकण्यात आली आहे. पुणे शहरातील व्हेईकल ट्रॅकिंग सिस्टीम, पीएमपीएमएल बससेवा, पीएमसी केअर अशा विविध प्रकल्पांना “इंटिग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल’ सेंटरशी जोडण्यात येत आहे. त्यांच्या सेवांबाबतच्या प्राथमिक चाचण्या पूर्ण झाल्या आहेत. स्मार्ट सिटी प्रकल्पांसह अशा विविध विभागांच्या प्रकल्पांची सेंटरच्या माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी संदर्भात आढावा घेऊन पुढील दिशा ठरविण्यासाठी ही भेट आयोजित केली होती.

मूलभूत समस्या सोडविण्यास होणार मदत
पुणे शहरात पोलीस, पीएमपीएमएल अशा विविध सेवा दिल्या जात आहेत. त्यासंदर्भातील अद्ययावत डेटा हा नवीन तंत्रज्ञानाच्या साह्याने एकत्रित करून तो प्रभावीपणे वापरून वाहतूक सुधारण्याबरोबर पुणेकरांच्या मूलभूत समस्या सोडविण्यासाठी या “कमांड ऍन्ड कंट्रोल’ सेंटरच्या माध्यमातून स्मार्ट इलेमेंट्‌सचा उपयोग होईल, अशी मला खात्री असल्याचे महापौर टिळक यांनी या भेटीवेळी सांगितले.

स्मार्ट सिटीच्या माध्यमातून “इंटिग्रेटेड कमांड ऍन्ड कंट्रोल’ सेंटरची अंमलबजावणी हे पुणे शहराच्या विकासातील महत्त्वाचे पाऊल ठरणार आहे. या माध्यमातून संकलित होणारा डेटा भविष्यवेधी नियोजन आणि सेवा उपलब्ध करण्यासाठी महत्त्वाचा ठरेल. विविध विभागांच्या सेवांचे एकात्मीकरण (इंटिग्रेशन) केल्याने शहरातील अधिकारी, नागरिक अशा सर्व घटकांना अद्ययावत माहिती मिळण्यासाठी व नवनवीन उपाययोजनांचा लाभ घेण्यासाठी उपयुक्त ठरेल.

– डॉ. राजेंद्र जगताप, मुख्य कार्यकारी अधिकारी, स्मार्ट सिटी


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)