कमवाकवस्तीत विद्यार्थ्यांना कराटे प्रशिक्षण

लोणी काळभोर- सध्याच्या काळात विद्यार्थ्यांना विशेषतः मुलींना स्वसंरक्षणासाठी लहान वयातच कराटे सारखे खेळ शाळेतच शिकवण्याची गरज आहे, असे मत कदमवाकवस्ती ( ता. हवेली ) ग्रामपंचायतीच्या सदस्या राणी बडदे यांनी व्यक्त केले. कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीतील संभाजीनगर येथील ज्ञानदीप विद्यालयात युवा कार्यकर्ते अविनाश बडदे यांनी विद्यार्थ्यांसाठी मोफत कराटे प्रशिक्षण वर्ग सुरू केला आहे. या वर्गाचा शुभारंभ नुकताच झाला. त्यावेळी बडदे बोलत होत्या. त्या म्हणाल्या की, गेल्या काही वर्षांत महिला, मुलींवर होणाऱ्या अत्याचारांचे प्रमाण वाढले आहे. त्यामुळे मुलींनी स्वसंरक्षणासाठी कराटे सारखे खेळ आत्मसात केले पाहिजेत. मुलींच्या आई-वडिलांनी ही स्वसंरक्षणासाठी आपल्या मुलींना कराटे सारखे खेळ शिकवणे गरजेचे झाले आहे. मुली व महिलांना छेडणाऱ्यांना व्यक्‍तीला लगेच प्रत्युत्तर मिळत नाही. त्यामुळे त्यांचे धाडस वाढते;परंतु संबंधित मुलगी जर कराटे शिकलेली असेल तर लगेच प्रत्युत्तर देईल. त्यामुळे तिचे संरक्षण तर होईलच;परंतु संबंधित छेड काढणाऱ्याची परत एखाद्या मुलीला छेडण्याची हिंमत होणार नाही असे त्यांनी नमूद केले. उपस्थितांचे स्वागत अविनाश बडदे यांनी केले.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)