कमल हसन ‘या’ चित्रपटानंतर अभिनय क्षेत्रातून घेणार निवृत्ती

कमल हसन यांचे फिल्मी करियर दमदार राहिले आहे. साऊथ चित्रपटांसोबत त्यांनी अनेक हिंदी चित्रपटांमध्येही अभिनय केला आहे.  कमल हसन अनेक चित्रपट बॉक्सऑफिसवर सुपरहिट ठरले आहेत. यामुळे त्यांचा चाहता वर्गही मोठा आहे. परंतु  कमल हसन यांनी एक मोठा निर्णय घेतला आहे. या निर्णयाने त्यांचा चाहता वर्ग नक्कीच नाराज होणार आहे.

एका इंग्रजी वृत्तपत्राच्या वृत्तानुसार, कमल हसन यांचा ‘मक्कल निधि मय्यम’ पक्ष आगामी २०१९ च्या निवडणुकांसाठी तामिळनाडूमधून उमेदवारांना निवडणार आहेत. ते म्हणाले कि, आगामी ‘इंडियन २’ चित्रपटाची शूटिंग पूर्ण झाल्यानंतर अभिनयाच्या क्षेत्रातून निवृत्ती घेणार आहे. या चित्रपटाची शूटिंग १४ डिसेंबरपासून सुरु होणार आहे. ते पुढे म्हणाले, त्यांची प्रोडक्शन कंपनी सार्वजनिक कार्यक्रमांना अर्थसाहाय्य करेल, अशी माहिती कमल हसन यांनी किझाकंबलम येथे झालेल्या एका पत्रकार परिषदेत दिली.

-Ads-

कमल हसन यांचा  ‘इंडियन २’ हा चित्रपट १९९६ मधील सुपरहिट ठरलेला इंडियन या चित्रपटाचा सिक्वेल असणार आहे. या चित्रपटात कमल हसन यांच्यासह काजल अग्रवाल मुख्य भूमिकेत असणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शंकर करणार आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
1 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)