कमल टवरी, शाम देशपांडे यांना ‘जीवन गौरव पुरस्कार’ जाहीर

पुणे – विश्‍वशांती केंद्र आळंदी, माईर्स एमआययटी पुणे आणि रामेश्‍वर (रूई) ग्रामस्थांच्या वतीने देण्यात येणारा यंदाचा जीवन गौरव पुरस्कार भारत सरकारचे माजी सचिव कमल टवरी आणि पुण्याचे माजी अतिरिक्त विभागीय आयुक्त शाम देशपांडे यांना प्रदान करण्यात येणार आहे. प्रसिध्द संगणकतज्ज्ञ आणि पद्मविभूषण डॉ. विजय भटकर यांच्या हस्ते या पुरस्कारांचे वितरण होणार आहे. येत्या 25 मार्च रोजी प्रभू श्रीरामचंद्र जन्मसोहळ्याचे औचित्य साधून लातूर जिल्ह्यातील रामेश्‍वर (रूई) येथे हा पुरस्कार प्रदान सोहळा होणार आहे, अशी माहिती एमआयटीचे संस्थापक अध्यक्ष डॉ. विश्‍वनाथ कराड यांनी दिली.

ज्ञान-विज्ञान आणि आध्यात्माचा समन्वय साधून आयुष्यभर समाजप्रबोधन आणि सांप्रदायिक सद्‌भावनेचे कार्य करून आदर्श निर्माण केल्याबद्दल कमल टवरी आणि शाम देशपांडे यांना हा पुरस्कार प्रदान करण्यात येणार आहे. यावेळी ह.भ.प. बालयोगी हरिहर दिवेगावकर यांचे काल्याचे किर्तन होणार असल्याची माहिती डॉ. विश्वनाथ कराड यांनी दिली.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)