कमला मिल दुर्घटनेनंतर रुफटॉप हॉटेल्सबद्दलचा निर्णय मागे घेतला जाणार?

मुंबई -कमला मिल दुर्घटनेनंतर आता रुफटॉप हॉटेल्सबद्दलचा निर्णय मागे घेतला जाण्याची दाट शक्यता आहे.पालिका आयुक्त अजोय मेहतांनी रुफटॉप हॉटेल्सबद्दलच्या धोरणाला मंजुरी दिली होती. मात्र आता हा निर्णय मागे घेण्याबद्दलचा प्रस्ताव आल्याने हा निर्णय अजोय मेहता मागे घेणार असल्याची चर्चा आहे.

कमला मिल दुर्घटनेनंतर आयुक्तांनी आपल्या निर्णयाचा फेरविचार करावा, अशी मागणी भाजपनं केली आहे. पालिका आयुक्तांनी दोन महिन्यांपूर्वीच  रुफटॉप हॉटेलबद्दलच्या धोरणाला मंजुरी दिली होती.मात्र त्यावेळी या निर्णयाला काँग्रेस आणि भाजपकडून विरोध करण्यात आला होता.

-Ads-

दरम्यान युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांच्यासाठी हा ड्रिम प्रोजेक्ट असल्यानेच याबद्दलचा प्रस्ताव पालिका सभागृहात न आणता आयुक्तांनी त्यांच्या अधिकारातून या धोरणाला मंजुरी दिली असल्याचीही चर्चा होती.मात्र आता या दुर्घटनेनंतर हा निर्णय मागे घेण्यात येऊ शकतो.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)