कमला मिल दुर्घटनेचा चौकशी अहवाल हायकोर्टात सादर

मुंबई – कमला मिल अग्नीतांडव आणि रेस्टारंन्ट आणि पब्सना देण्यात आलेल्या परवान्याची चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या त्रिसदस्यीय समितीने उच्च न्यायालयात अहवाल सादर केला. न्यायालयाने याची दखल घेऊन अहवालाची प्रत पालीकेला देण्याचे आदेश दिले.

कमला मिल दुर्घटनेची चौकशी करा. अशी मागणी करणाऱ्या माजी आयपीएस अधिकारी ज्युलीओ रिबोलो यांनी दाखल केलेल्या याचिकेबरोबरोच अन्य याचिका दाखल आहेत.

या आगीची चौकशी व्हावी याकरीता राज्यसरकारकडून त्रिसदस्यीय समितीची स्थापना करण्यात आली होती. केरळचे माजी मुख्य न्यायमूर्ती ए.व्ही. सावंत, वास्तुविशारद वसंत ठाकूर नगरविकास विभागाचे माजी मुख्य सचिव के. नलीनक्षण आदी सदस्यांचा या समितीत समावेश होता. न्यायालयाने 10 सप्टेंबर पर्यंत चौकशी समितीला अहवाल सादर करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार आज अहवाल सादर करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)