कमला मिल दुर्घटनाप्रकरणी चौकशी कमिटीला मुदतवाढ

17 सप्टेंबरला अहवाल सादर करण्याचे आदेश
मुंबई – कमला मिल अग्नीतांडव प्रकरणी चौकशी करण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या कमिटीला अहवाल सादर करण्यास उच्च न्यायालयाने दोन आठवड्याची मुदतवाढ दिली. न्यायमूर्ती भुषण गवई आणि न्यायमूर्ती एम.एस. कर्णिक यांच्या खंडपीठाने ही मुदतवाढ देताना याचिकेची पुढील सुनावणी 17 सप्टेबरपर्यंत तहकूब ठेवली.

कमला मिल दुर्घटनेची चौकशी करा, अशी मागणी करणारी माजी आयपीएस अधिकारी ज्युलीओ रिबेलो यांची तसेच अन्य याचिकांची दखल घेऊन न्यायालयाने दणका दिल्यानंतर एप्रिल महिन्यात उच्च न्यायालयाचे सेवानिवृत्त मुख्य न्यायमूर्ती ए व्ही सावंत यांच्या नेतृत्वाखालील आर्किटेक्‍ट वसंत ठाकूर आणि नगरविकास खात्याचे माजी मुख्य सचिव के. नलिनाक्षण अशी त्रिसदस्य कमिटी स्थापन केली.

या कमिटीला 31 ऑगस्टपर्यंत अहवाल सादर करण्याचे निर्देश दिले होते. ही कमिटी कमला मिलमधील आगीची सर्वंकष चौकशी करण्याबरोबरच मुंबईत अशा प्रकारच्या घटनेची कोणत्याही हॉटेल, उपाहारगृहात पुनरावृत्ती होऊ नये याकरिता शिफारशीही सादर करणार आहे. या याचिकेवर खंडपीठासमोर आज सुनावणी झाली. यावेळी राज्य सरकारने कमिटीला अहवाल सादर करण्यासाठी 10 सप्टेंबरपर्यंत मुदतवाढ देण्याची विनंती केली. ती न्यायालयाने मान्य करून याचिकेची सुनावणी 17 सप्टेंबरपर्यंत तहकूब ठेवताना अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)