कमला मिल कम्पाऊंड अग्नितांडव प्रकरणातील पब मालकांची दिवाळी तुरूंगात 

युग पाठक, जिगर संघवी, कृपेश संघवी आणि अभिजीत मानकर यांचा जामीन अर्ज फेटाळला 

मुंबई: कमला मिल अग्नितांव प्रकरणी अटकेत बसलेल्या पब मालकांचे जामीन अर्ज उच्च न्यायालयाने फेटाळले आहेत. “मोजोस ब्रिस्टो’ पबचे मालक युग पाठक, “वन अबव्ह’ पबचे मालक जिगर संघवी,

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

कृपेश संघवी आणि अभिजीत मानकर यांचा जामीन अर्ज न्या. प्रकाश नाईक यांनी फेटाळून लावला. जो घडला तो अपघात होता. परंतू ज्या परिस्थितीत हे पब चालविले जात होते ते टाळले असते तर ही जिवीतहाणी टळली असती. असे मत व्यक्‍त करून हा जामीन अर्ज फेटाळून लावला. यामुळे या पब मालकांची दिवाळी आता तुंरूगातच जाणार आहे.

9 डिसेंबरच्या रात्री कमला मिल कम्पाउंड मधील “वन अबव्ह’ आणि “ममोजोस ब्रिस्टो’ या रेस्टोबारना लागलेल्या आगीत गुदमरुन 14 जणांचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी मुंबई पोलिसांनी ना. म. जोशी मार्ग पोलिस ठाण्यात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर कृपेश संघवी, जिगर संघवी, अभिजीत मानकर, युग टुली आणि युग पाठक यांना अटक करून त्यांच्या विरोधातयांच्यावर सदोष मनुष्यवध, बेजबाबदारपणा, निष्काळजीपणा, दुसऱ्याच्या जीवितास कारणीभूत, अग्निविरोधक यंत्रणेचा वापर न करणे या आरोपांनुसार गुन्हे दाखल करण्यात आले.

या प्रकरणी सत्र न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर “मोजोस ब्रिस्टो’ पबचे मालक युग पाठक, “वन अबव्ह’ पबचे मालक जिगर संघवी, कृपेश संघवी आणि अभिजीत मानकर यांनी उच्च न्यायालयात जामीनासाठी अर्ज दाखल केले होते . त्या अर्जावर आज सुनावणी झाल्यानंतर न्यायालयाने या तिघांचेही जामीन आज अर्ज फटाळून लावले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)