कमला मिल आगप्रकरण; ‘वन अबव्ह’ पबच्या मालकाकडून सीबीआय चौकशीची मागणी

मुंबई -शुक्रवारी कमला मिल कंपाउंडमध्ये लागलेल्या भीषण आगीत  १४ जणांचा मृत्यू झाला होता तर अनेकजण गंभीर जखमी झाले होते. ही आग कमला  मिल कंपाउंडमध्ये असलेल्या ‘वन अबव्ह’, आणि मोजोस या दोन  पबला लागली होती. दरम्यान पोलिसांनी निष्काळजीपणाचा ठपका ठेवत या दोन्ही  पबच्या मालकांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल केला आहे.

मात्र,आता आपण निर्दोष असून या दुर्घटनेत  सगळी चूक  ‘मोजोस  बिस्ट्रो’  पबचीच आहे. आपल्याला विनाकारण या प्रकरणात गोवण्यात येत आहे. त्यामुळे याप्रकरणाची  निष्पक्षपाती चौकशी करण्यासाठी हे प्रकरण सीबीआयकडे सोपविण्यात यावं,’ अशी मागणी वन अबव्हच्या मालकाने पंतप्रधानांना पत्र लिहून केली आहे. तसेच मोजोसचा मालक युग पाठक हा वरिष्ठ पोलीस अधिकारी के.के. पाठक यांचा मुलगा आहे. त्यामुळेच पोलिसांकडून आम्हाला न्याय मिळत नसल्याचा आरोपही या पत्रात करण्यात आला आहे.  तसेच या पबच्या मालकाकडून या पत्राची एक- एक प्रत मुख्यमंत्री आणि कायदामंत्र्यांनाही देण्यात आली आहे.

 


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)