कमलनाथ, सचिन पायलट यांच्या याचिका फेटाळल्या 

नवी दिल्ली: मध्यप्रदेश आणि राजस्थानातील विधानसभांच्या निवडणुकांपुर्वी राजकीय पक्षांना दुरूस्त मतदार याद्या छापील स्वरूपात पुरवण्यात याव्यात अशी मागणी करणाऱ्या दोन स्वतंत्र याचिका ज्येष्ठ कॉंग्रेस नेते कमलनाथ आणि सचिन पायलट यांनी सर्वोच्च न्यायालयात केल्या होत्या. पण त्या याचिका न्यायालयाने फेटाळून लावल्या आहेत.
या मतदार याद्यांमध्ये अनेक नावे दुबार नोंदवण्यात आली असून यातील अनेक नावे बोगस आहेत अशी तक्रार या नेत्यांनी आपल्या याचिकेत केली होती. आपल्या तक्रारींची दखल घेण्याचा आदेश निवडणूक आयोगाला देण्यात यावा अशी मागणीही त्यांनी या याचिकेत केली होती. तथापी न्या ए. के. सिक्री आणि न्या. अशोक भुषण यांच्या खंडपीठाने या दोन्ही याचिका फेटाळून लावल्या आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)