कमलजादेवी विद्यालयात विद्यार्थी-पालक मेळावा उत्साहात

मंचर- मुलांकडून शिक्षकांना अरेरावी होत असून बेशिस्त वर्तन शाळेमध्ये वाढत चालले आहे. याशिवाय मुलींच्या छेडछाडीचे प्रमाण देखील वाढले आहे. हे रोखण्यासाठी सर्व पालकांनी पुढाकार घेऊन आपल्या पाल्याला शिस्त लावून शिक्षणाचा दर्जा सुधारण्यासाठी शिक्षकांना प्रोत्साहन द्यावे, असे आवाहन आंबेगाव तालुका पंचायत समितीचे माजी सभापती वसंतराव भालेराव यांनी केले. कळंब (ता. आंबेगाव) येथील कमलजादेवी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये विद्यार्थी-पालक मेळाव्याचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष गंगाराम भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, ज्येष्ठ नागरिक संघाचे अध्यक्ष दशरथ भालेराव, माजी सरपंच पांडुरंग डोके, उद्योजक नितीन भालेराव, कमलजादेवी क्रीडा मंडळाचे अध्यक्ष शशिकांत भालेराव, माजी चेअरमन शशिकांत कहडणे, दिलीप ग्रामीणचे संचालक सुनील भालेराव, पोलीस पाटील तानाजी कानडे, शांताराम भालेराव, बाळासाहेब आरेकर, महेंद्र तोडकर, गणेश वर्पे, शंकर भालेराव, सुनील कानडे, महेश भालेराव व विद्यालयाचे प्राचार्य नानासाहेब नेहे यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थ आणि पालक उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)