कमलजादेवी मातेच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण

मंचर- भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या कळंब (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत कमलजादेवी मातेच्या नवरात्र उत्सवाची तयारी पूर्ण झाली असून उत्सवात प्रवचन, कीर्तन आणि महाप्रसादाचे नियोजन करण्यात आले आहे. नवरात्रोत्सवाचा कार्यक्रम माजी सभापती वसंत भालेराव आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक यशवंत कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली संपन्न होणार आहे. उत्सवाला 110 वर्षांची परंपरा आहे. पंधरा दिवस चालणाऱ्या उत्सवात मंदिरात घटस्थापना होणार आहे. रोज सकाळी पहाटे काकडा आरती, अखंड वीणावादन, हरिपाठ, पारायण, प्रवचन व रात्री 9 वाजता कीर्तन होईल. घटस्थापनेचा कार्यक्रम आंबेगाव तालुका पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंत भालेराव, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य प्रमोद कानडे, पंचायत समितीच्या माजी सदस्या निर्मला भालेराव, सरपंच राजश्री भालेराव यांच्यासह विविध संस्थांचे पदाधिकारी व ग्रामस्थांच्या उपस्थितीत होणार आहे. दहा वर्षापूर्वी कमलजादेवी मंदिराचा 65 लाख रुपये खर्च करून जीर्णीद्धार करण्यात आला होता. तसेच लोकसहभागातून 18 लाख रुपये खर्चून गेल्या दोन वर्षापूर्वी देवीच्या सभोवतालचा परिसर चांदीच्या मखरीने वेढण्यात आला आहे. मंदिराला संपूर्ण रंगरंगोटी व मूर्तीला वज्रलेप करण्यात आला आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)