कमलजादेवी माता मंदिरात घटस्थापना

मंचर- कळंब (ता. आंबेगाव) येथील ग्रामदैवत आदिशक्‍ती कमलजादेवी माता मंदिरात घटस्थापना चैतन्य महाराज कबीर व माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे यांच्या हस्ते करण्यात आली. तर कलशधारी शोभायात्रेत आणि देवीच्या मुखवट्याच्या पदयात्रेत भाविक मोठ्या संख्येने सहभागी झाले होते. नवरात्र उत्सव माजी सभापती वसंत भालेराव आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे यशवंत कानडे यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडतो. प्रथमतः हनुमान मंदिरात भजन पार पडल्यानंतर गावातून कलशधारी महिलांची आणि देवीच्या मुखवट्याची पदयात्रा काढण्यात आली. या पदयात्रेमध्य साधू, महंत टाळ-मृदंगाच्या गजरात सहभागी झाले होते. याप्रसंगी सभापती उषा कानडे, ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक यशवंत कानडे, गंगाधर कानडे, गंगाराम भालेराव यांच्यासह भाविक सहभागी झाले होते. कमलजादेवी माता मंदिरात देवीची विधिवत पूजा पुरोहित सदानंद कुलकर्णी व पुजारी शिवाजी उबाळे यांच्या उपस्थितीत पार पडली. देवीच्या मंदिरात गाथा पूजन आणि विणा पूजन करुन पुजारी प्रशांत गुरव यांनी देवीची महाआरती घेण्यात आली. त्यानंतर उपस्थितांना प्रसादाचे वाटप करण्यात आले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)