कमलजादेवी इंग्लिश शाळेत फॅन्सी डेस स्पर्धा उत्साहात

मंचर- आंबेगाव तालुक्‍यातील कळंब येथील कमलजादेवी प्री प्रायमरी इंग्लिश शाळेमध्ये फॅन्सी डेस स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. यामध्ये 35 विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला. श्रीराम चिखले-झाड, ईनायत इनामदार-घड्याळ, शार्दुल भालेराव- शिवाजी महाराज, हुमेरा शेख-गर्भातील मुलगी, श्‍लोक कानडे-संभाजी महाराज, देवेन भालेराव-वारकरी, मृणाल भालेराव-कोलगेट, काव्यांजली सोमवंशी-झाशीची राणी, वर्धा भालेराव-भाजीवाली, शिवराज चिखले-वारकरी या मुलांनी आपल्या भूमिका सादर करुन सर्वांची मने जिंकली. यावेळी मुख्याध्यापक विठ्ठल गभाले, शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य दत्ता कानडे, निलेश कानडे, इसाक शेख, नवनाथ कानडे, संतोष कानडे, गणेश लोहकरे उपस्थित होते. कार्यक्रमाचे परीक्षण शिक्षिका गीतांजली शेलार, मीना निऱ्हाळी, सुनंदा भालेराव यांनी केले. प्रास्ताविक आदिती चिखले यांनी मांडले. सूत्रसंचालन सनाह शेख यांनी केले तर स्वाती भालेराव यांनी आभार मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)