“कमलजा’चे 22 विद्यार्थी शिष्यवृत्तीत यशस्वी

मंचर- कळंब (ता. आंबेगाव) येथील कमलजादेवी माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विद्यालयातील शिष्यवृत्ती परीक्षेत पाचवी आणि आठवीचे एकूण 22 विद्यार्थी परीक्षेत पास झाले असल्याची माहिती प्राचार्य नानासाहेब नेहे यांनी दिली. या परीक्षेत पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी दोन विद्यार्थी, तर आठवीमधील अकरा विद्यार्थी पात्र ठरले आहेत. शिष्यवृत्तीसाठी पात्र विद्यार्थी पुढीलप्रमाणे- (इयत्ता पाचवी) – आर्या अविनाश सहाणे, रोहन नरेंद्र डोके आणि इयत्ता आठवीमधील – प्रतीक एकनाथ थोरात, प्रणव राजेंद्र भागवत, रोहित नरेंद्र डोके, सानिका साईनाथ भालेराव, शिवानी शशिकांत भालेराव, श्रद्धा सचिन कानडे, स्वाती माधव गीते, तनुजा नंदकुमार भालेराव, अंकिता दीपक काळे या विद्यार्थ्यांनी यश मिळवले. या यशस्वी विद्यार्थ्यांना शिक्षक महेंद्र तोडकर, बाळासाहेब आरेकर, मच्छिंद्र वायाळ, साधना वायाळ, संगीता कोळपकर, भागवत पाटील, तेजस्विनी पाटील, उमेश वाडेकर राजू आढे यांनी मार्गदर्शन केले. या यशस्वी विद्यार्थ्यांचे आणि मार्गदर्शक शिक्षकांचे अभिनंदन आंबेगाव पंचायत समितीच्या सभापती उषा कानडे, माजी सभापती वसंतराव भालेराव, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रमोद कानडे, सरपंच राजश्री भालेराव, उपसरपंच डॉ. सचिन भालेराव, सामाजिक कार्यकर्ते विष्णु कानडे, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष गंगाराम भालेराव, भीमाशंकर कारखान्याचे संचालक रमेश कानडे, तसेच संस्थेचे अध्यक्ष प्रकाश बोरा व शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी आणि समस्त ग्रामस्थ कळंब यांनी केले.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:
-Ads-

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)