कमंडलू पंचक्रोशी विद्यालयात विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन

वाई – जनसामान्यांमध्ये वैज्ञानिक दृष्टिकोन निर्माण व्हावा यासाठी वाई तालुका विज्ञान प्रदर्शनाचे आयोजन मंगळवार, दि. 18 ते गुरूवार दि. 20 दरम्यान कमंडलू पंचक्रोशी विद्यालय आसरे येथे करण्यात आले आहे. प्रदर्शनाचे उद्‌घाटन मंगळवारी दुपारी 1 वाजता आ. मकरंद पाटील यांच्या हस्ते व पंचायत समितीच्या सभापती सौ. रजनी भोसले यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.

यावेळी उपसभापती अनिल जगताप, जिल्हा परिषद सदस्या सौ. संगीता मसकर मान्यवर उपस्थित रहाणार आहेत. गुरूवार, दि. 20 रोजी दुपारी 1 वाजता प्रदर्शनाचा सांगता समारंभ शिक्षक आमदार दत्तात्रय सावंत, रोटरी प्रांत साक्षरता अध्यक्षा स्वाती हेरकळ यांच्या प्रमुख उपस्थितीत व जिल्हा परिषदेचे शिक्षणाधिकारी राजेश क्षिरसागर यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे. यावेळी सर्वांनी उपस्थित रहावे असे आवाहन गटशिक्षणाधिकारी कमलाकांत म्हेत्रे, विस्तार अधिकारी विष्णू मेमाणे, केंद्रप्रमुख विजय भांगरे, मुख्याध्यापक मारूती ससाणे यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)