कब्बड्डी स्पर्धेत आदिवासी होस्टेल घोडेगाव प्रथम

तळेघर – वाकडेश्वर कला क्रीडा मंडळ व सांस्कृतिक प्रतिष्ठान काळवाडी यांच्या वतीने आदिवासी खेळांडूमध्ये खेळांची आवड निर्माण व्हावी यासाठी आयोजित कबड्डी स्पर्धेत आदिवासी होस्टेल घोडेगाव यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. द्वितीय क्रमांक कबड्डी संघ कोलतावडे (ता. आंबेगाव), तृतीय क्रमांक कबड्डी संघ तांबे (ता. जुन्नर), चतुर्थ क्रमांक कबड्डी संघ पाटण (ता. आंबेगाव) यांनी पटकाविला. स्पर्धेचे पारितोषिक वितरण जिल्हा परिषद उपाध्यक्ष विवेक वळसे पाटील यांच्या हस्ते करण्यात आले. तसेच स्पर्धेचे उद्‌घाटन पिंपरी चिंचवड महानगरपालिकेचे क्रीडा अधिकारी विश्‍वास गेंगजे यांच्या हस्ते करण्यात आले. याप्रसंगी जांभोरी गावचे उपसरपंच विलास केंगले, शरद बांबळे, प्रमोद केंगले आदी उपस्थित होते. स्पर्धेमध्ये एकूण 30 आदिवासी संघांनी सहभाग घेतला होता. या स्पर्धेच्या निमित्ताने सांस्कृतिक प्रतिष्ठानच्या वतीने आदिवासी समाजासाठी काम करणारे तळेघरचे सरपंच चंद्रकांत धर्मा उगले यांना आदिवासी भूषण पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष ज्ञानेश्वर पारधी, मारुती केंगले, उपाध्यक्ष शंकर भोकटे, सचिव तुकाराम शिंगाडे हे उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचलन पुनाजी पारधी यांनी केले तर मायाजी शिंगाडे यांनी मानले.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)