कब्बडी असोसिएशनच्या अध्यक्षपदी डॉ. बाळासाहेब पोखरकर

मंचर- आंबेगाव तालुका कबड्डी असोसिएशनच्या अध्यक्षपदी ऍड. बाळासाहेब पोखरकर, सचिवपदी शिक्षक संजय भालेराव आणि खजिनदारपदी मंचर ग्रामपंचायत सदस्य संदीप ऊर्फ लक्ष्मण थोरात यांची निवड झाली असल्याची माहिती आंबेगाव तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने देण्यात आली आहे. आंबेगाव तालुका कबड्डी संघटनेची स्थापना करण्यात आली आहे. ही संघटना पुणे जिल्हा कबड्डी संघटनेशी संलग्न व संघटनेच्या सर्व नियमांची अधीन राहून कामकाज करणार आहे. या माध्यमातून तालुक्‍यातील सर्व कबड्डी संघांनी आपली अधिकृत नोंदणी आंबेगाव तालुका कबड्डी संघटनेत करावी, असे आवाहन संघटनेचे सचिव शिक्षक संजय भालेराव यांनी केले आहे. तालुक्‍यात जिल्हा राज्य व राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेचे आयोजन करून किशोर, कुमार तसेच खुल्या गटातील खेळाडूंना प्रोत्साहित केले जाईल. बहुतेक ठिकाणी कबड्डी खेळ नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. तेथे कबड्डी पुनर्जीवित करण्याचा प्रयत्न आंबेगाव तालुका कबड्डी असोसिएशनच्या माध्यमातून केला जाईल, तसेच शालेय स्तरावरील कबड्डी स्पर्धांचे आयोजन संघटनेच्या माध्यमातून करण्यात येईल. लवकरच आंबेगाव तालुका कबड्डी लीग स्पर्धेचे आयोजन करण्यात येणार असून यासाठी पुढील सभेचे आयोजन शनिवारी (दि. 4) मंचर येथील संघटनेच्या कार्यालयात आयोजित केली आहे. संघटनेमध्ये इतर पदाधिकाऱ्यांची निवड करण्यात आली आहे.त्यांची नावे पुढीलप्रमाणे- कार्याध्यक्षपदी युवानेते अंकित जाधव, उपाध्यक्ष बाळासाहेब खानदेशी, शशिकांत भालेराव, प्रवीण थोरात, सहसचिव संभाजी काळे, युवराज काळे,गुलाब थोरात आणि सहखजिनदारपदी कुंदन काळे यांची निवड करण्यात आली आहे, अशी माहिती आंबेगाव तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीन देण्यात आली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा


ताज्या बातम्यांसाठी प्रभातचे मोबाईल अॅप डाऊनलोड करा

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)