कबीन खान पूर्ण करणार ह्रतिक रोशनचा “सुपर 30′ चित्रपट? 

पाटणातील जगप्रसिद्ध गणिततज्ज्ञ आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित बायॉपिक “सुपर 30′ सध्या अडचणीतून बाहेर येताना दिसत नाही. ह्रतिक रोशनची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपटा तेव्हा अडचणीत सापडला, जेव्हा डायरेक्‍टर विकास बलह यांच्यावर लैंगिक शोषणाचे आरोप झाले. त्यानंतर विकास बहल यांच्या चित्रपट सोडावा लागला.

या चित्रपटाचे आतापर्यत 90 टक्‍के काम पूर्ण झाले आहे. परंतु आता असा प्रश्‍न आहे की, उरलेले 10 टक्‍के काम कोण पूर्ण करणार. हे काम डायरेक्‍टर कबीर खान पूर्ण करणार असल्याचे समजते. हा चित्रपट रिलीज डेट 25 जानेवारी 2019 पूर्वी पूर्ण करावा लागणार आहे.

दरम्यान, कोणत्याही डायरेक्‍टरला हे काम करणे सहज शक्‍य नाही. कारण त्याला शेवटच्या टप्प्यात चित्रपट पूर्ण करायचा आहे. मात्र, कबीर सध्या आणखी एका बीग बजेट बायॉपिकच्या कामात व्यस्त आहे. परंतु, हा चित्रपट पूर्ण न झाल्यास निर्मात्यांचे नुकसान तर होणारच आहे. याशिवाय आनंद कुमार यांनी केलेले कामही व्यर्थ ठरेल. “सुपर 30’सोबत कंगणा रणावत हिचा “मणिकर्णिका ः द क्‍वीन ऑफ झासी’ हा चित्रपटही प्रदर्शित होणार आहे. त्यामुळे आता ह्रतिक रोशनचा “सुपर 30′ चित्रपटा पूर्ण होतो का नाही याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता वाढली आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)