कबड्डी स्पर्धेत ज्ञानमंदिर हायस्कूल प्रथम

आळेफाटा- तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत आळे (ता. जुन्नर) येथील ज्ञानमंदिर हायस्कूल व कनिष्ठ महाविद्यालयाच्या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत यश संपादन केले आहे, अशी माहिती मुख्याध्यापक राजाराम चासकर यांनी दिली. शिरोली येथील स्व. रामकृष्ण मोरे इंग्लिश मीडियम स्कूलमध्ये या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. महाविद्यालयातील 14 वयोगटातील मुले व 17 वयोगटातील मुलींच्या संघाने प्रथम क्रमांक पटकावला. त्यामुळे बारामती येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय स्पर्धेत समावेश झाला आहे. सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचा संस्थेचे उपाध्यक्ष उल्हास सहाणे, सचिव बाळासाहेब गुंजाळ, संचालक अरूण हुलवळे, अर्जुन पाडेकर, पर्यवेक्षक पांडुरंग गावडे, उपमुख्याध्यापिका उज्वला चोथवे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)