कबड्डी स्पर्धेत जिजामाता कॉलेज विजयी

सासवड- पुरंदर तालुका कबड्डी असोसिएशनच्या वतीने आयोजित तालुकास्तरीय कबड्डी स्पर्धेत जिजामाता कॉलेज जेजुरी संघाने 19 वर्षाखालील गटात प्रथम क्रमांक पटकाविला आहे. 14, 17 व 19 वर्षाखालील मुलांच्या विभागीय कबड्डी स्पर्धा सासवड येथील शिवाजी इंग्लिश मीडियम स्कूल अँड ज्युनियर कॉलेजच्या प्रांगणात पार पडल्या.
19 वर्षाखालील गटात महात्मा गांधी विद्यालय व किलाचंद कनिष्ठ विद्यालय नीरा यांनी द्वितीय क्रमांक व वाघीरे महाविद्यालय सासवडच्या संघाने तृतीय क्रमांक मिळविला. 17 वर्षाखालील वयोगटातील स्पर्धेत क्रांतिवीर उमाजी नाईक विद्यालयाने प्रथम, पुरंदर हायस्कूलने द्वितीय, न्यू इंग्लिश स्कूल मांडकीने तृतीय क्रमांक मिळवत विजय संपादित केला. 14 वर्षांखालील वयोगटातील स्पर्धेत क्रांतिवीर उमाजी नाईक विद्यालय भिवडीने प्रथम, महात्मा गांधी विद्यालयाने द्वितीय व किलाचंद कनिष्ठ विद्यालय नीरा, वाघिरे हायस्कूल सासवडने तृतीय क्रमांक मिळवत स्पर्धेत यश प्राप्त केले.
उत्कृष्ट चढाई बद्दल बेस्ट रायडर म्हणून अभिजीत मोकाशी याला सन्मानित करण्यात आले. स्पर्धेत एकूण 65 संघ सहभागी झाले होते. स्पर्धेसाठी संत सोपानकाका बॅंकेच्या वतीने क्रीडा साहित्याचे वाटप करण्यात आले. शिवछत्रपती पुरस्काराचे मानकरी सूर्यकांत पाटील यांच्या हस्ते बक्षीस वितरण करण्यात आले. यावेळी बबन जगताप, प्रकाश पवार, राजाभाऊ जगताप, मधु जगताप, तात्या मचाले, सदानंद जगताप, बी. एस. बोरावके, विलास जगताप, प्रल्हाद कारकर, रवींद्र जगताप आदी उपस्थित होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)