कबड्डी स्पर्धा: भैरवनाथ भोसरी, डोर्लेवाडी, पर्व, कदम संघांची आगेकूच 

file photo

कुमारांची जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धा 

पुणे: डॉ. विश्वजीत कदम, भैरवनाथ भोसरी, डोर्लेवाडी, पर्व या संघांनी आपआपल्या गटात विजय मिळविताना पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशन व काळभैरवनाथ विकास प्रतिष्ठान आयोजित 42 व्या कुमार गट मुले व मुली जिल्हा अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी स्पर्धेचा दुसरा दिवस गाजविला. खराडी येथील कै.राजाराम भिकू पठारे प्राथमिक विद्यालयाच्या कै. वि.मा. पठारे इनडोअर स्टेडियममध्ये ही स्पर्धा सुरू आहे.

सकाळच्या सत्रात डॉ.विश्वजीत कदम संघाने सूसच्या शिवगर्जना कबड्डी संघावर 20-15 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला डॉ. विश्वजीत कदम संघाकडे 13-12 अशी एक गुणांची निसटती आघाडी होती. डॉ. विश्वजीत कदम संघाच्या भूमीपुत्र कांबळे याने अष्टपैलू खेळ केला, विनायक जाबरे याने केलेल्या उत्कृष्ट पकडी, रोहन तोंडे याने केलेल्या खोलवर चढाया यांच्या जोरावर हा विजय मिळविला. शिवगर्जना संघाच्या प्रशांत खोपडे व प्रतीक साळुंके यांनी चांगला प्रतिकार केला. मात्र त्यांना आपल्या संघाला विजय मिळवून देता आला नाही.

दुसऱ्या सामन्यात भोसरीच्या भैरवनाथ संघाने आनंद स्पोर्टस संघावर 55-12 असा धुव्वा उडवीत विजय मिळविला. मध्यंतराला भैरवनाथ संघाकडे 15-4 अशी आघाडी होती. भैरवनाथ संघाच्या अक्षय वढाणे याने अष्टपैलू खेळ केला. त्या संकेत लांडगे याने केलेल्या चौफेर चढाया व योगेश अक्षमणी याने घेतलेल्या पकडींमुळे हा विजय सुकर झाला. आनंद स्पोर्टस्‌ संघाच्या अक्षय सीताफळे याने एकाकी झुंज दिली.

तिसऱ्या सामन्यात डोर्लेवाडी संघाने देहूरोडच्या श्री शिवाजी प्रतिष्ठानचा 35- 14 अशा धुव्वा उडवत आपल्या गटात विजय मिळविला. मध्यंतराला डोर्लेवाडी संघाकडे 22-4 अशी भक्कम आघाडी होती. डोर्लेवाडीच्या रोहित गवळी याने केलेल्या चढाया व निलेश शिंदे व उत्कर्ष लोणकर याने केलेल्या पकडींमुळे हा सहज विजय मिळू शकले. देहूरोडच्या श्री शिवाजी प्रतिष्ठानच्या जुबेर शेख,सौरव राठोड याने केलेल्या चढाया व श्रीयश माळी याने मोक्‍याच्या वेळी पकडी केल्या, पण तोपर्यंत संघ पराभवाच्या छायेत गेला होता.

चौथ्या सामन्यात पर्व क्रीडा संघाने साई स्पोर्टस्‌ संघावर 19-12 अशी मात करीत विजय मिळविला. मध्यंतराला पर्व संघाकडे 6-5 अशी अवघ्या एक गुणाची आघाडी होती. पर्व संघाच्या अजय चव्हाण याने अष्टपैलू खेळाने आणि अजय सोळंके याने केलेल्या चौफेर चढाया आणि सोहम चव्हाण याने घेतलेल्या उत्कृष्ट पकडींमुळे हा विजय सोपा झाला. साई स्पोर्टस्‌ संघाच्या लक्ष्मीकांत जमादार याने उत्कृष्ट चढाया करीत आणि सागर कथरिया याने घेतलेल्या पकडींमुळे जोरदार प्रतिकार करताना सामन्यात चांगलाच रंग भरला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
1 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)