कबड्डी निवड चाचणी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ जाहीर

कुमार व कुमारी राज्य अजिंक्‍यपद व निवड चाचणी कबड्डी

शुभम शेळके(संघनायक),अंकिता चव्हाण (संघनायक) म्हणून निवड.

पुणे : परभणी जिल्ह्यातील जिंतुर येथील ज्ञानसंगोपन सेवाभावी संस्था आयोजित 45 वी कुमार, कुमारी गट महाराष्ट्र राज्य अजिंक्‍यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा संघ पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे यांनी जाहीर केला.

या स्पर्धा 7 डिसेंबर ते 10 डिसेंबर 2018 या कालावधीत कबड्डी महर्षी शंकरराव उर्फ बुवा साळवी क्रीडानगरी नुतन महाविद्यालयाच्या मैदानावर पार पडेल. 45 वी कुमार, कुमारी गट महाराष्ट्र राज्य अजिंक्‍यपद व निवड चाचणी स्पर्धेसाठी पुणे जिल्ह्याचा प्रातिनिधिक संघ पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आला आहे.

कुमार गट मुले – शुभम शेळके(संघनायक), तुषार आधवडे, अभिजित चौधरी, संकेत लांडगे, सुजीत लांडगे, रोहित निघोट, मयुर शेर्वे,किरण गंगणे, आकाश दिसले, पवण कारंडे, तन्मय चव्हाण. राखीव खेळाडू – रोहन बुर्डे, किशोर भोसले, अभिषेत धामणे यांची निवड केली आहे. या स्पर्धेसाठी प्रशिक्षक म्हणून बाळकृष्ण चव्हाण तर व्यवस्थापकपदी भरत शिळीमकर यांची नेमणूक करण्यात आली आहे. या खेळाडूंची निवड नितिन खाटपे, राजेंद्र पायगुडे, शेखर सावंत,सुनिल मोरे,महेंद्र भांबुरे यांच्या निवड समितीने केली आहे.

कुमारी गट मुलींचा संघ : अंकिता चव्हाण (संघनायक), पायल वसवे, लीना जमदाडे,श्वेता माने, तेजल पाटील, अनुष्का फुगे, ऐश्वर्या शिंदे, ऐश्वर्या झाडबुके, अपेक्षा शिंदे, राधा मोरे, प्रतिक्षा दाभाडे, अक्षदा खोमणे. राखीव सिध्दी पोळ, समृध्दी कोळेकर यांची निवड केली आहे तर प्रशिक्षक शिल्पा भोसले, व्यवस्थापक सुवर्णा एनपुरे यांची निवड करण्यात आली आहे. या संघाची निवड मोहिनी जोग,रंजना पोतेकर, प्रशांत सातव,सुवर्णा एनपुरे, नयना मोरे यांच्या निवड समितीने केली असल्याचे पुणे जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या कार्याध्यक्षा वासंती बोर्डे यांनी कळविले आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)