कपूर हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचे कुस्तीत यश

लोणी काळभोर- येथील पृथ्वीराज कपूर मेमोरियल हायस्कूल आणि कनिष्ठ महाविद्यालयातील पाच विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेत घवघवीत यश संपादन केले असून, एका विद्यार्थ्याची जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे.
महाराष्ट्र शासनाच्या क्रीडा आणि युवक संचालनालय आणि जिल्हा क्रीडा परिषद पुणे, यांच्या संयुक्त विद्यमाने लोणीकंद (ता. हवेली) येथील जाणता राजा कुस्ती केंद्रात नुकतीच हवेली तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेत ओंकार भोसले ( 63 किलो वजनी गटात प्रथम क्रमांक), मयूर चव्हाण (50 किलो वजनी गटात द्वितीय), हर्षद शेंडगे (54 किलो वजनी गटात द्वितीय), प्रतीक चव्हाण (58 किलो वजनी गटात तृतीय) आणि मानव जावळे (54 किलो वजनी गटात तृतीय क्रमांक) असे यश मिळविले आहे. यापैकी ओंकार भोसले याची इंदापूर येथे होणाऱ्या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेसाठी निवड झाली आहे. हे यशस्वी विद्यार्थी क्रीडा शिक्षक प्रा. राजू काळभोर, प्रा. एस. डी. यादव, प्रा. एस. आर. कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली सराव करीत आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)