कपिल सिब्बल यांच्याकडून संशयास्पद जमीन व्यवहार

स्मृती इराणी यांचा आरोप
नवी दिल्ली – सीबीआयच्या रडारवर आलेल्या एका व्यावसायिकाशी कॉंग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनी संशयास्पद जमीन व्यवहार केल्याचा आरोप केंद्रीय मंत्री आणि भाजप नेत्या स्मृती इराणी यांनी आज केला. याप्रकरणी कॉंग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणीही इराणी यांनी केली.

एका वेबसाईटचा हवाला देऊन इराणी यांनी सिब्बल यांना लक्ष्य केले. सिब्बल यांनी कोट्यवधी रूपयांची जमीन कवडीमोल किमतीत पियूष गोयल नावाच्या व्यावसायिकाकडून खरेदी केली. गोयलची कंपनीही सिब्बल आणि त्यांच्या पत्नीने विकत घेतली. कॉंग्रेसच्या नेतृत्वाखालील केंद्रातील यूपीए सरकारने लाचखोरीबद्दल गोयलच्या चौकशीचे आदेश दिले होते. मनी लॉण्डरिंगमध्ये गुंतलेल्या त्या व्यावसायिकाशी सिब्बल यांनी व्यवहार केला, असा आरोप इराणी यांनी केला.

दरम्यान, सिब्बल यांनी त्यांच्यावरील आरोप फेटाळून लावला. संबंधित वेबसाईटविरोधात मानहानीचा खटला दाखल करण्याचा इशाराही त्यांनी दिला. मी माझ्या पैशांतून खरेदी केलेल्या जमिनीच्या व्यवहाराबाबतची माहिती प्राप्तिकर विभागाला दिल्याचे त्यांनी म्हटले. सीबीएसई पेपर लिक आणि फेसबुक डेटा लिक यांसारख्या महत्वाच्या प्रकरणांवरून दुसरीकडे लक्ष वळवण्यासाठी माझ्यावर आरोप करण्यात आल्याचा प्रत्यारोपही त्यांनी केला.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)