कपिल शर्मा जुन्या टीमला करतोय मिस…

प्रसिद्ध कॉमेडियन कपिल शर्माने सात महिन्यांचा ब्रेक घेऊन पुनरागमन केले. ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ या शोमध्ये तो आला. या नवीन शो मध्ये कपिलचा जुना अंदाज प्रेक्षकांना अनुभवता येणार आहे. हा शो गेम्सवर आधारित असणार आहे. ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’च्या पहिल्या भागात नवज्योतसिंग सिद्धू, चंदन प्रभाकर आणि कीकू शारदा यांनी प्रेक्षकांना एन्टरटेंन केलं. परंतु फॅन्स जुन्या टीममधील सुनील ग्रोवर, अली असगर, सुमोना चक्रवर्ती यांना मिस करत आहेत. तसेच कपिल शर्माही त्याच्या जुन्या टीमला खूप मिस करतोय.

#okjaanu #TKSS

A post shared by Kapil Sharma (@kapilsharma) on

अली असगरने कपिलच्या नवीन सुरु होणाऱ्या शोला शुभेच्छा देण्यासाठी ट्विट केले. अलीचे ट्विट वाचून कपिल  इमोशनल झाला. त्याने ट्विटरवर अलीचे धन्यवाद मानले आणि जुन्या टीमला मिस करत असल्याचेही ट्विटमध्ये त्याने नमूद केले .


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)