कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवरमध्ये समझोता

काही महिन्यांपूर्वी कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर यांच्यात चांगलीच जुंपली होती. त्यानंतर कित्येक दिवस दोघेही एकमेकांचे तोंडही बघत नव्हते. मात्र आता या दोघांमध्ये समझोता झाला असल्याचे समजते आहे. एवढेच नव्हे तर हा समझोता सलमान खानने घडवून आणला असल्याचेही समजते आहे. सलमानच्या “भारत’मध्ये सुनील ग्रोवर काम करतो आहे. तर दुसरीकडे कपिल शर्माच्या नवीन शोची निर्मिती सलमान खान करणार आहे. या नात्याने तो दोघांमधील दुवा बनला.

“भारत’च्या सेटवर सलमानने सुनीलशी दोघांमधील वादाबाबत सविस्तर चर्चा केली. त्यानंतर त्याने सुनीलला समजावले. कपिल शर्मा आणि सुनील ग्रोवर हे दोघेही एकत्रितपणे प्रेक्षकांना हवे आहेत. म्हणून दोघांनी एकत्र यायला हवे आहे. सलमान खानने समजावल्यावर सुनीलला नकार देणे शक्‍य नव्हते. त्याने कपिल शर्माबरोबर काम करायचे मान्य केले. आपल्या नवीन शोसाठी कपिल आता मुंबईत आला आहे. फिल्मसिटीमध्ये त्याच्या शो साठी नवीन सेटही तयार केला गेला आहे. आताचा नवीन शो मात्र थोडा वेगळा असणार आहे. यात कॉमेडी अधिक आणि गेम फॉरमॅट कमी असणार आहे.

-Ads-

सुनील ग्रोवरने साथ सोडल्यावर कपिल शर्माची स्थिती खूप बिघडली होती. त्याच्या शोमधून एक एक करत अनेक कलाकार बाहेर पडले. चॅनेलने त्याच्या शो ला ब्रेक लावला. त्यानंतर पुन्हा नवीन शो करण्याचा कपिलचा प्रयत्नही फ्लॉप ठरला होता. त्याने पुन्हाएकदा सिनेमात काम करण्याचाही प्रयत्न करून बघितला. पण यश न आल्याने थोडे नैराश्‍यही आले होते. त्याला चक्‍क मानसोपचाराची मदत घ्यायला लागली. आपल्या मित्राची ही अवस्था बघून कदाचित सुनील ग्रोवरला त्याच्यावर दया आली असावी. सलमानची मध्यस्थी केवळ एक निमित्त झाले असावे. पण आता या दोघांची मैत्री पुन्हा एकदा छोट्या पडद्यावर बघायला मिळणार यामुळे प्रेक्षकांना आनंदी व्हायला काही हरकत नसावी.

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)