कपिल शर्माची रूपेरी पडद्यावर वापसी

कॉमेडियन कपिल शर्मा रुपेरी पडद्यावर पुन्हा एकदा झळकणार आहे. “सन ऑफ मनजीत सिंह’ या नवीन सिनेमातून तो रुपेरी पडद्यावर कमबॅक करणार आहे. नुकतेच स्वतः कपिल शर्माने याबाबतची घोषणा केली. आपल्या नवीन सिनेमाचे पहिले पोस्टरही त्याने रिलीज केले आहे. यामुळे त्याच्या फॅन्सना आनंदाचा धक्काच बसला आहे.

टीव्हीवर आपल्या कॉमेडी शो मधून प्रचंड प्रसिद्धी मिळवलेल्या कपिल शर्माला गेल्या काही महिन्यांपासून टीव्ही शो किंवा सिनेमा अशा दोन्ही प्लॅटफॉर्मपासून दूर रहायला लागले होते. “द फॅमिली टाईम विथ कपिल’ या दुसऱ्या शो नंतर कपिल गायबच झाला होता. त्याचा हा नवीन शो केवळ तीनच एपिसोडनंतर बंद झाला होता. हा शो बंद होण्यामागचे कारण कपिलची ढासळेली प्रकृती असे सांगण्यात येत होते. कपिल आपल्या उपचारांवर लक्ष केंद्रित करणार असल्याने शो बंद झाला असा प्रेक्षकांचा समज झाला होता.

त्यापूर्वी त्याच्या शोमध्ये बऱ्याच गडबडी झाल्या होत्या. त्याचे आणि सुनिल ग्रोवरचे भांडण झाले. त्याच्या शो मधून काही कलाकारांनी माघार घेतली. वेळेचे योग्य नियोजन न केल्यामुळे काही बडे स्टार त्याच्या शोमध्ये येऊनही शुटिंग होऊ शकले नव्हते. कपिलला चॅनेलकडून घसरलेल्या टीआरपीबद्दल समजही दिली गेली होती. सरते शेवटी “कॉमेडी नाईटस विथ कपिल’ हा गाजलेला शो बंद करण्याची नामुष्की त्याच्यावर ओढवली होती.

दरम्यानच्या काळात कपिल नेमके काय करतो आहे, हे कोणालाच माहिती नव्हते. त्याला रिहॅबिलीटेशन सेंटरमध्ये पाठवले गेल्याचेही ऐकिवात आले होते. अलिकडेच व्हायरल झालेल्या त्याच्या फोटोमध्ये तो अगदीच स्लीम झाल्याचे दिसते आहे. पण आपल्या नवीन पंजाबी सिनेमाचे पोस्टर रिलीज करून त्याने या प्रश्‍नाचे उत्तर दिले आहे. कपिल स्वतःच या सिनेमाचा प्रोड्युसरही असणार आहे. त्यामुळे “सन ऑफ मनजीत सिंह’ची दुहेरी जबाबदारी त्याच्यावर असणार आहे. हा सिनेमा 12 ऑक्‍टोबरला रिलीज होणार आहे. त्याशिवाय कपिल शर्मा आणखी एक टिव्ही शो घेऊन येतो आहे, असेही समजले होते.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)