कपिल शर्माचा नवीन शो झाला सुपर फ्लॉप

ऑस्ट्रेलियातून परतताना सुनील ग्रोव्हर याच्यासोबत विमानात झालेले भांडण, त्यानंतर कपिल शर्माचे आजारपण, घसरलेला कार्यक्रमाचा टीआरपी यामुळे कपिल शर्माचा “कॉमेडी शो’ चॅनेलवरून हटवण्यात आला होता. पण कालपासून ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ हा कार्यक्रम कपिल शर्मा घेऊन आला आहे. या नव्या कार्यक्रमाच्या अंदाजाबाबात चाहत्यांमध्येही उत्सुकता वाढली होती.

रविवारपासून कपिल शर्माचा “फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ हा कार्यक्रम सुरू झाला. पण त्याच्या पूर्वीच्या कार्यक्रमासारखी पसंती या कार्यक्रमाला मिळालेली नाही. या कार्यक्रमाकडून कपिलच्या चाहत्यांना अपेक्षा होत्या पण त्याच्या फॅन्समध्ये याबाबत निराशा आहे. यंदा कपिल शर्मा आपल्या नव्या कार्यक्रमामध्ये कॉमेडीसोबतच काही खेळदेखील घेऊन आला आहे.

कपिलच्या शोमधील हे खेळ त्यामध्ये सहभागी होणारे सामान्य प्रेक्षक परिवारासोबत खेळणार आहेत. कपिल शर्माच्या चाहत्यांनी त्याला कार्यक्रमाचे जुने फॉर्मेट पुन्हा आणावे अशी मागणी केली आहे. चंदन प्रभाकर आणि किकू शारदा हे त्याचे जुने सहकारी ‘फॅमिली टाईम विथ कपिल शर्मा’ या कार्यक्रमामध्ये आहेत. सोबतच मराठी अभिनेत्री नेहा पेंडसे या कार्यक्रमात आहे. कपिल शर्माच्या चाहत्यांनी ट्‌विटरवर खुलेआम या कार्यक्रमाबद्दल आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)