कपिलमुळे पुन्हा शोचे शुटींग रद्द…..

मुंबई : कपिल शर्मा समोरच्या अडचणी काही केल्या कमी होण्याचे नाव घेत नाही कारण त्याच्यामुळे आणखी एका चित्रपटाच्या टीमला शुटींग न करताच परत जाण्याची नामुष्की ओढवली आहे.बादशाहो या चित्रपटाच्या प्रमोशनसाठी अजय देवगण, इशा गुप्ता, इलियाना डिक्रूझ आले होते. पण हे सगळे अभिनेते कपिलची वाट पाहून निघून गेले.
हॉटेलमध्ये झोपला असल्यामुळे कपिलला शोला पोहोचता आले नाही. स्टुडिओजवळच असलेल्या हॉटेलमध्ये कपिल आहे तो १५ मिनिटांमध्ये येईल, असे बादशाहोच्या टीमला सांगण्यात आले. पण बराच वेळ झाल्यानंतरही कपिल आला नाही म्हणून अखेर सगळे शूटिंग न करताच परतले. या सगळ्या प्रकारानंतर आता अजय देवगन पुन्हा कपिलच्या शोमध्ये जाणार नसल्याचे बोलले जात आहे.शो रद्द करावा लागण्याची कपिलचीही पहिलीच वेळ नाही. याआधी जब हॅरी मेट सेजलच्या प्रमोशनवेळी शाहरुख आणि अनुष्काला शूटिंग न करताच परतावं लागलं होतं. त्यावेळी कपिलची तब्येत बिघडली होती. तर टॉयलेट : एक प्रेमकथा वेळी अक्षय कुमारचं शूटिंगही होऊ शकलं नव्हतं. अर्जुन कपूर आणि अनिल कपूरलाही तसंच परतावं लागलं होतं.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)