कराड : लाहोटी कन्याशाळेतील यशस्वी विद्यार्थिनींसमवेत मुख्याध्यापिका शर्मिला बायस. समवेत वांगीकर व इतर.

कराड, दि. 14 (प्रतिनिधी) – येथील लाहोटी कन्या प्रशालेच्या विद्यार्थिनींनी शिष्यवृत्ती परीक्षेत सुयश संपादन केले. पूर्व माध्यमिक शिष्यवृत्ती परीक्षेत सात विद्यार्थिनी आल्या. तनुजा पाटील हिने राज्यात पंधरावा तर वैष्णवी कोकरे हिने राज्यात सतरावा क्रमांक प्राप्त केला. तेजस्विनी शिंदे, प्राची महाडिक, हर्षिता पाटील, काजल शिंदे व नयन सावंत यांनी जिल्हा गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत प्रशालेतील पाच विद्यार्थिनींना शिष्यवृत्ती प्राप्त झाली. अनुजा पवार, प्राजक्ता शेवाळे, अपूर्वा थोरात, मितल माळी व गार्गी सुर्यवंशी यांनी जिल्ह्यात गुणवत्ता यादीत स्थान पटकावले. या यशाबद्दल प्रशालेच्या मुख्याध्यापिका शर्मिला बायस, उपमुख्याध्यापक औदुंबर वांगीकर, पर्यवेक्षक आप्पासाहेब पाटील यांनी त्यांचे अभिनंदन केले. विभागप्रमुख अश्विनी कुंभार, विकास पाटील, हेमा जंगम, अर्चना सोलापुरे, बाळासाहेब देसाई, युवराज पुकळे, जगदीश कुंभार, मिनाली दरबान, संगीता माळी यांनी मार्गदर्शन केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)