कन्याकुमारी एक्‍सप्रेस खोळंबल्याने प्रवाशांचे हाल

पिंपरी– कन्याकुमारी एक्‍स्प्रेस आज बुधवारी (दि. 30) सकाळी नऊ वाजल्यापासून चिंचवड रेल्वे स्थानकावर उभी होती. त्यामुळे या एक्‍स्प्रेसमधील प्रवाशांचा खोळंबा झाला आहे. प्रवाशांमधून रेल्वे प्रशासनाच्या कारभारवर नाराजी व्यक्त केली जात आहे. मंगळवारी मुंबईत पडलेल्या मुसळधार पावसामुळे वाहतूक पूर्णपणे बंद करण्यात आली होती. दरम्यान, आज सकाळी चिंचवड रेल्वे स्थानकावर कन्याकुमारी-मुंबई ही एक्‍स्प्रेस रखडली होती. मोबाइल चार्ज नसल्यामुळे प्रवाशांना नातेवाईकांशीही संपर्क साधता येत नव्हता. रेल्वेचे अधिकारी प्रवाशांना जुजबी उत्तरे देत होते. रेल्वे मधल्या ट्रॅकवर थांबवण्यात आल्यामुळे प्रवाशांना खाली उतरता येत नव्हते. त्यामुळे प्रवाशांवर उपासमारीची वेळ आली. त्यामुळे प्रवाशातून संताप व्यक्त केला जात होता.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)