कनेरसरचे केंद्रप्रमुख रेटवडे यांचा सन्मान

दावडी-खेड पंचायत समितीतील कनेरसरचे केंद्रप्रमुख संभाजी रेटवडे यांचा सेवापूर्तीनिमित्त सन्मान करण्यात आला. जिल्हा परिषद सदस्या निर्मला पानसरे यांच्या हस्ते शंभूप्रतिमा, उभा पोशाख व सन्मानचिन्ह देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला.
रेटवडे यांनी वेल्हे, रेटवडी, गोसासी, कनेरसर, गुळाणी आदी ठिकाणी शिक्षक, मुख्याध्यापक, केंद्रप्रमुख या शैक्षणिक पदांवर सेवा केली. ते खेड तालुका शिक्षक पतसंस्थेचे सरचिटणीसही होते. या कार्यक्रमासाठी खेडचे गटशिक्षणाधिकारी सोपानराव वेताळ, सांगलीचे शिक्षणाधिकारी विठ्ठलराव गोरडे, विस्तार अधिकारी लक्ष्मी शिनगारे, माजी पंचायत समिती सदस्य द्वारकानाथ टिजगे, कनेरसरचे सरपंच सुधीर माशेरे, रेटवडीचे उपसरपंच नामदेव डुबे, बापू दौंडकर, बहुळचे सरपंच गणेश वाडेकर, सिद्धेगव्हाणचे आदर्श सरपंच शशिकांत मोरे, येमाई देवस्थानचे अध्यक्ष मोहन दौंडकर, भाजपाचे तालुका उपाध्यक्ष दिलीप माशेरे, पदवीधर शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष द. सी. सावंत, शिक्षक संघाचे राज्य उपाध्यक्ष राजेश कांबळे, पदवीधर शिक्षक संघटनेचे तालुकाध्यक्ष शांताराम नेहेरे, शिक्षकनेते संजय राळे, माजी सभापती मुगुटराव मोरे, सेवानिवृत्त शिक्षक संघटनेचे अध्यक्ष नारायण गावडे, सुदामराव वेहळे, शां. श्री. थिगळे, नामदेव गोरडे, वा. दा. दौंडकर, केंद्रप्रमुख सुरेश कातोरे, शिक्षक भारतीचे राज्य उपाध्यक्ष बबनराव गावडे, पदविधर शिक्षक संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष संदीप म्हसुडगे, डीसीपीएसचे अध्यक्ष सचिन गावडे, अखिल खेड शिक्षक संघाचे अध्यक्ष जालिंदर दिघे आदी मान्यवर व मोठ्या संख्येने शिक्षक उपस्थित होते. यावेळी गटशिक्षणाधिकारी सोपानराव वेताळ व सेवानिवृत्त शिक्षणविस्तार अधिकारी लक्ष्मी शिनगारे यांचेही उत्तम सेवेबद्दल सन्मान करण्यात आले. कनेरसर व गुळाणी केंद्रातील शिक्षकांनी यशस्वी संयोजन केले. सूत्रसंचालन शिक्षक संघाचे माजी अध्यक्ष धर्मराज पवळे व तंत्रस्नेही गणेश दरवडे यांनी केले. प्रास्ताविक शिक्षक संघाचे तालुकाध्यक्ष विठ्ठलराव तांबे यांनी केले तर शिक्षक पतसंस्थेचे माजी सभापती पी. डी. पवळे यांनी आभार मानले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)