कधी सट्टेबाजाने संपर्क साधला होता का? -मितालीला आयसीसीचा सवाल

कोलकाता : आयसीसीची कोलकात्यात सध्या पाच दिवसीय बैठक सुरु आहे. दरम्यान, या बैठकीत सर्वच मुद्द्यावर चर्चा झाली मात्र, चर्चेचा मुद्दा ठरला तो म्हणजे महिला क्रिकेट. दरम्यान, या बैठकीत मॅच फिक्सिंगसाठी कधी सट्टेबाजाने संपर्क साधला होता का, असा प्रश्न आयसीसीने भारतीय महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राजला विचारला.

मिताली राजला आयसीसीच्या या बैठकीसाठी विशेष निमंत्रण देण्यात आले होते. ”या बैठकीत महिला क्रिकेटवर चर्चा झाली. काही वेळासाठी मिताली बैठकीला आली होती. तिला सट्टेबाजाने संपर्क साधला होता का प्रश्न विचारला. मात्र आतापर्यंत आपल्याला कुणीही संपर्क केला नसल्याचे तिने सांगितले,” अशी माहिती एका अधिकाऱ्याने दिली. यसीसी सध्या महिला क्रिकेटला मोठ्या प्रमाणात कव्हरेज देत असून महिला क्रिकेटचे प्रसारणही केले जात आहे. त्यामुळे महिला क्रिकेटमध्ये कोणत्याही प्रकारचा भ्रष्टाचार होऊ नये, यासाठी आयसीसी कडक पावले उचलत आहे.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup:
0 :heart:
0 :joy:
0 :heart_eyes:
0 :blush:
0 :cry:
0 :rage:

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)