रेडा- इंदापूर येथील रयत शिक्षण संस्थेच्या सौ. कस्तुराबाई श्रीपती कदम माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील मल्लांनी तालुकास्तरीय कुस्ती स्पर्धेमध्ये घवघवीत असे यश संपादन केले असून यातील 11 मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड करण्यात आली आहे. इंदापूर येथील कै. रंगनाथ मारकड कुस्ती प्रशिक्षण केंद्रात या स्पर्धा नुकत्याच पार पडल्या. या स्पर्धेत विद्यालयातील एकूण 27 मल्लांनी सहभाग घेतला, त्यापैकी 11 मल्लांची जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे. यशस्वी विद्यार्थ्यांचे विद्यालयाचे प्राचार्य रामचंद्र पाटील, शाळा समितीचे सदस्य प्रदीप गारटकर, डॉ. श्रेणिक शहा, डॉ. लहू कदम, विजय शिंदे, गटनेते कैलास कदम, नगरसेवक श्रीधर बाब्रस, पर्यावेक्षक माणिक जाधव आदींनी अभिनंदन करून पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छा दिल्या. यशस्वी विद्यार्थ्यांना मारकड कुस्ती केंद्राचे प्रमुख मारुती मारकड, विद्यालयाचे क्रीडा शिक्षक भालचंद्र बिराजदार, संजय गायकवाड आदींनी मार्गदर्शन केले.
वयोगट, वजनी गटानुसार जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड झालेले मल्ल
14 वर्षे – 32 किलो : अभिजीत चौगुले, 35 किलो : विश्‍वजीत तांबे, 38 किलो : विनायक शेंडगे, 41 किलो : अभिजीत कचरे. 17 वर्षे (फ्रीस्टाईल कुस्ती) – 46 किलो : प्रथमेश तावरे, 63 किलो : सौरभ काळे. (ग्रीक रोमन) – 42 किलो : अनिकेत शेंडे, 46 किलो : प्रतिक बंडगर, 50 किलो : ऋषिकेश काळेल, 54 किलो : सौरभ कारंडे, 100 किलो : श्रेयस होळकर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)