कदमवाकवस्ती येथे अपघातात तरुणाचा मृत्यू

लोणी काळभोर- पुणे-सोलापूर महामार्गावर कदमवाकवस्ती ग्रामपंचायतीच्या हद्दीत दुचाकी महामार्गाच्या शेजारी असलेल्या सेवा रस्त्याच्या कठड्याला घासून झालेल्या अपघातात, माहेरी असलेल्या पत्नीस भेटून घरी परतणाऱा तरुण मृत्युमुखी पडला असल्याची घटना मंगळवारी (दि. 20) रोजी रात्री 10 वाजण्याच्या सुमारास घडली.

या अपघातात दीपक सोपान जाधव (वय 23, सध्या रा. कुंजीरवाडी, नायगांव रेल्वे गेटजवळ, ता. हवेली, मूळ रा. भालकापूर, ता. करमाळा, जि. सोलापूर) हा मृत्युमुखी पडला आहे. याप्रकरणी त्याचे चुलते यशवंत शेटीबा जाधव यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार दीपक सायंकाळी साडेपाचच्या सुमारास आपली पत्नी जयश्री हिस भेटण्यासाठी दुचाकीवरून (एमएच 16 वाय 8126) साडेसतरानळी, हडपसर येथे गेला होता. तो पुन्हा घरी परतत असताना रात्री 10 च्या सुमारास कदमवाकवस्ती ग्रामपंचायत हद्दीतील संजय नर्सरीसमोर आला असता त्याची दुचाकी महामार्गाच्या कडेला असलेल्या सेवा रस्त्याच्या कठड्यास घासली गेली, त्यामुळे त्याचा तोल गेला आणि तो संरक्षक जाळीवर पडला. तुटलेल्या जाळीचे लोखंडी गज बाहेर आले होते. ते त्याच्या छातीस लागल्याने दीपक गंभीर जखमी झाला. त्याला तात्काळ नजीकच्या खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले; परंतु उपचारापूर्वीच तो मृत झाला होता.


‘प्रभात’चे फेसबुक पेज लाईक करा

What is your reaction?
0 :thumbsup: Thumbs up
0 :heart: Love
0 :joy: Joy
0 :heart_eyes: Awesome
0 :blush: Great
0 :cry: Sad
0 :rage: Angry

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)