कदमवाकवस्तीत ज्येष्ठेचा मृतदेह आढळला

लोणी काळभोर-पुणे-सोलापूर लोहमार्गावर कदमवाकवस्ती (ता. हवेली) गावाच्या हद्दीत एका अनोळखी महिलेचा मृतदेह आढळून आला आहे. लोणी काळभोर पोलीस ठाण्याच्या हद्दीत किलोमीटर क्रमांक 205/8 जवळ लोहमार्गावर हा मृतदेह आढळून आला आहे. या महिलेचे वय अंदाजे 60 ते 65 वर्षे आहे. या महिलेचे केस काळे-पांढरे वाढलेले असून अंगावर गुलाबी रंगाची साडी व गुलाबी रंगाचा ब्लाऊज आहे. या संदर्भात लोणी काळभोर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तरी मृतदेहा बाबत कुणाला काही माहिती असल्यास लोणी काळभोर पोलीस ठाण्याशी 020-26913260 किंवा पोलीस उपनिरीक्षक एम. एस. तलबार यांच्याशी या क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक क्रांतीकुमार पाटील यांनी केले आहे.

-Ads-
दैनिक प्रभातचे फेसबुक पेज लाईक करा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Enable Google Transliteration.(To type in English, press Ctrl+g)